शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

जिल्ह्यातील १०० गावे तंटामुक्त

By admin | Updated: March 22, 2015 01:24 IST

तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत २०१३-१४ या वर्षात जिल्ह्यातील एकूण १०० गावे तंटामुक्त म्हणून राज्य शासनाने जाहीर केले.

रोहितप्रसाद तिवारी  मोर्शीतंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत २०१३-१४ या वर्षात जिल्ह्यातील एकूण १०० गावे तंटामुक्त म्हणून राज्य शासनाने जाहीर केले. धारणी तालुक्यातील सर्वाधिक २६ तर सर्वात कमी धामणगाव रेल्वे आणि भातकुली तालुक्यातील प्रत्येकी एका गावाला तंटामुक्तीचा मान मिळाला आहे. तत्कालीन गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या कल्पनेतून राज्यात तंटामुक्त गाव मोहीम राबविली जात आहे. गाव तंटामुक्त होण्याकरिता गावागावांत सर्वसमावेशक, राजकारण विरहीत तंटामुक्त गाव समितीची स्थापना केली जाते. गावात तंटे होऊ नये, झालेच तर ते तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून आपसात सोडविले जावेत, शिवाय गावात सलोखा निर्माण व्हावा, महिलांचे, अपंगांचे, मागासवर्गीयांचे प्रश्न सोडविण्यात यावे, अवैध धंद्यांवर अंकुश लावून या धंद्यात गुंतलेल्यांना तंटामुक्त गाव समितीच्या प्रयत्नातून पर्यायी रोजगार मिळावा, अतिक्रमण होऊ नये, अंधश्रध्दा निर्मूलन तथा वाईट प्रथा बंद व्हाव्यात इत्यादी उपक्रम तंटामुक्त गाव समितीच्या मार्फत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून व्हावेत, अशी ही संकल्पना आहे. तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून वर्षभर राबविलेल्या उपक्रमांनंतर तंटामुक्त गावांनी स्वमूल्यांकन करुन गाव तंटामुक्त झाल्याचे जाहीर केल्यावर जिल्हा अंतर्गत मूल्यमापन समिती या गावांना भेटी देऊन त्यांच्या कार्यांचे मूल्यांकन करते, जिल्ह्यांतर्गत समितीने संबंधित गाव निवडल्यावर जिल्हाबाह्य मूल्यांकन समिती भेट देऊन मूल्यांकन करते आणि त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामार्फत गावांची यादी गृहमंत्रालयास पाठविण्यात येऊन राज्य शासन अशा गावांची तंटामुक्त गाव म्हणून घोषणा करते. नुकतेच राज्य शासनाने सन २०१३-१४ च्या राज्यातील निवड झालेल्या तंटामुक्त गावांची यादी, त्यांना मिळणाऱ्या बक्षिसांच्या रकमेसह जाहीर केली. एकूण १७ कोटी १३ लक्ष २५ हजार रुपयाचे बक्षीस राज्यातील अशा गावांना मिळणार आहेत. अमरावती जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील १०० गावांची निवड तंटामुक्त गाव म्हणून राज्य शासनाने केली आहे. यात दर्यापूर तालुक्यातील ८, अंजनगाव तालुक्यातील ४, चांदूर बाजार १७, वरुड, मोर्शी आणि चिखलदरा प्रत्येकी ९, तिवसा ६, चांदूर रेल्वे ५, नांदगाव खंडेश्वर ३, भातकुली आणि धामणगाव रेल्वे तालुक्यातील प्रत्येकी १, अमरावती २, आणि धारणी तालुक्यातील जिल्ह्यातून सर्वाधिक एकूण २६ गावांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.