शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

१० वर्षीय बालकाची काकाने धारधार शस्त्रानं केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 22:01 IST

१० वर्षीय बालकाची काकाने धारधार शस्त्राचा वापर करून हत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. त्याने मृतदेहासह स्वत:ला गावातील मंदिरात कोंडून घेतले होते.

धारणी (अमरावती) : तालुक्यातील खारी येथे १० वर्षीय बालकाची काकाने धारधार शस्त्राचा वापर करून हत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. त्याने मृतदेहासह स्वत:ला गावातील मंदिरात कोंडून घेतले होते. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना नागरिकांनी आरोपीला ताब्यात मागितले. यावेळी झालेल्या दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त हाती आले आहे. योगेश वासुदेव येवले (१०) असे मृताचे, तर धन्नालाल श्यामलाल येवले (३२) असे आरोपी काकाचे नाव आहे. योगेश हा सायंकाळी सातच्या सुमारास ग्रामदैवत असलेल्या शिंगाजी मंदिरात काही मित्रांसमवेत दिवे लावण्यासाठी गेला होता. त्यांच्या पाठोपाठ धडकलेल्या धन्नालालने सुतारकामात वापरावयाच्या वासल्याने मानेवर वार करीत त्याची हत्या केली. या घटनेने घाबरलेल्या मुलांनी तेथून पळ काढला. यानंतर धन्नालालने मंदिराचे चॅनेल गेट लावून मृतदेहासह स्वत:ला बंदिस्त केले. ग्रामस्थांना याबाबत माहिती होताच त्यांनी मंदिर गाठले. मात्र, धन्नालाल सशस्त्र असल्याने कुणी पुढे गेले नाही. दरम्यान, धारणी पोलिसांना माहिती देण्यात आली. ठाणेदार किशोर गवई हे पोलीस ताफासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मंदिरात प्रवेश मिळवून धन्नालालला ताब्यात घेतले. त्याला बाहेर आणत असतानाच नागरिकांनी त्याला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली आणि पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून दगडफेक केली. या दगडफेकीत पोलीस वाहनाच्या काचा फुटल्या व शिपाई नंदकिशोर पाडमासे जखमी झाले. आरोपीला धारणीला आणत असताना वाटेत एसडीपीओ विशाल नेहुल यांचा ताफा मिळाला. त्यांच्या वाहनातून आरोपीला धारणीत आणण्यात आले. यानंतर पुन्हा एसडीपीओ विशाल नेहुल, ठाणेदार किशोर गवई यांनी खारी गाव गाठून तेथील तणाव निवळला. वृत्त लिहिस्तोवर घटनास्थळाचा पंचनामा सुरू होता. ------आधीही मारण्याचा प्रयत्न धन्नालाल हा कधीकधी विक्षिप्त वागतो. त्याने या विक्षिप्तपणातून आठ वर्षांपूर्वी योगेशला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता, अशी माहिती पुढे आली आहे.