शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत १० टक्के अनुकंपा भरतीला मंजुरी

By admin | Updated: January 10, 2015 22:46 IST

महापालिकेचा कारभार प्रभारींच्या भरवशावर सुरु असताना आता शासनाने १० टक्के अनुकंपा भरती प्रक्रियेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी रिक्त पदांच्या तुलनेत २० पात्र

अमरावती : महापालिकेचा कारभार प्रभारींच्या भरवशावर सुरु असताना आता शासनाने १० टक्के अनुकंपा भरती प्रक्रियेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी रिक्त पदांच्या तुलनेत २० पात्र अनुकंपा धारकांना नोकरीत सामावून घेतले जाणार आहे. या कार्यवाहीला जवळपास दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागेल, असे संकेत आहे.शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने अमरावती महापालिकेला १० टक्के अनुकंपा भरती प्रक्रियेला मंजुरी दिली आहे. आयुक्त अरुण डोंगरे, माजी महापौर विलास इंगोले यांच्या सततच्या पाठपुराव्याने अनुकंपाधारकांना नोकरीची संधी उपलब्ध होत आहे, हे विशेष. महापालिकेत २०१२ ते २०१४ या दरम्यान १८५ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. यात वर्ग 'क' ते 'ड'चा समावेश असून सेवानिवृत्त रिक्त पदांच्या अनुषंगाने अनुकंपाधारकांना नोकरीत सामावून घेण्याचे शासनाने निर्देशित केले आहे. प्रशासनाकडे २२ अनुकंपाधारकांची प्रकरणे सादर केली आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २० पात्र अनुकंपाधारकांना नोकरीत सामावून घेण्याची तयारी सुरु झाली आहे. अनुकंपाधारकांना न्याय मिळावा, यासाठी आयुक्तांच्या आदेशानुसार सामान्य प्रशासन विभागप्रमुख मंगेश जाधव यांनी शासनाकडे भरती मंजुरीचा प्रस्ताव १७ मे २०१४ रोजी पाठविला होता. त्यानंतर ११ डिसेंबर २०१४ रोजी सुधारित प्रस्तावदेखील पाठविण्यात आला. या दोन्ही प्रस्तावांची शासनाने दखल घेतली असून विशेष बाब म्हणून महापालिकेला १० टक्के अनुकंपाधारकांच्या भरती प्रक्रियेला मंजुरी दिली आहे. ही भरती प्रक्रिया राबविताना २०१२ या भरती वर्षांपासून गट 'क' व 'ड'मधील पदांच्या १० टक्के मर्यादेत नियुक्ती करण्याची कार्यवाही करावी, असा शासन निर्णय २५ जुलै २०१२ च्या प्रस्तावात दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आदेशित आहे. मागील काही वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनुकंपाधारकांना शासनाच्या नव्या आदेशाने न्याय मिळणार आहे. ही भरती प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी आयुक्त अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त विनायक औगड, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख मंगेश जाधव, दिलीप पाठक हे करतील. (प्रतिनिधी)