शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

बेलोरा विमानतळासमोर १० कार जळाल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 01:23 IST

अकोला राष्ट्रीय महामार्गालगतच्या बेलारा विमानतळासमोरील वाहनांच्या स्टॉक यार्डला लागलेल्या आगीत १० कार जळून खाक झाल्या. ही घटना रविवारी पावणेसहा वाजताच्या सुमारास घडली. महापालिका अग्निशमन विभागाला आग नियंत्रणात आणण्यासाठी दीड तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

ठळक मुद्देवाहनांच्या स्टॉक यार्डमध्ये आग : दीड तासांनंतर आग नियंत्रणात

अमरावती : अकोला राष्ट्रीय महामार्गालगतच्या बेलारा विमानतळासमोरील वाहनांच्या स्टॉक यार्डला लागलेल्या आगीत १० कार जळून खाक झाल्या. ही घटना रविवारी पावणेसहा वाजताच्या सुमारास घडली. महापालिका अग्निशमन विभागाला आग नियंत्रणात आणण्यासाठी दीड तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या आगीत सुमारे ५० लाख रुपये किमतीच्या कार जळाल्या असाव्यात, असा अंदाज अग्निशमन विभागाने वर्तविला आहे.प्राप्त माहितीनुसार, बेलोरा विमानतळाच्या समोरील भागात एका संकुलात नवीन, जुने वाहनांचे स्टॉक यार्ड आहे. यात अमरावतीच्या जायका मोटर्स आणि केतन मोटर्स या कार विक्रेत्याचे स्टॉक यार्ड असून, अचानक लागलेल्या आगीत १० कार जळाल्या. घटनेच्या वेळी यार्डात १०० वाहने होती. मात्र, समयसूचक तेने ही आग आटोक्यात आली. ही आग कशामुळे लागली, हे तूर्तास कळू शकले नाही. पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या पंचनाम्याअंती आगीचे कारण स्पष्ट होईल, असे अग्निशन कर्मचारी विजय पंधरे यांनी सांगितले.सायंकाळी ५.४५ वाजता लागलेली आग रात्री पावणेआठ वाजताच्या सुमारास तीन बंबाच्या साहाय्याने ंिनयंत्रणात आणली. या आगीमुळे बेलोरा गावात एकच खळबळ उडाली. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी विजय पंधरे, नसीर अहमद, मनोज इंगोले, वैभव गजभारे, धनराज पांडे, ज्ञानेश्वर शेळके या कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. 

टॅग्स :fireआगcarकार