शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

काँग्रेसमधून गेलेत ते कावळे, उर्वरित खरे मावळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 06:01 IST

तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात रविवारी ‘निर्धार २०१९’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या युवकांना मार्गदर्शन करीत होत्या. युवकांनो, आपण निर्धार केला पाहिजे, मी लढणार, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार, सामान्यजनांचे प्रश्न सोडविणार, जनतेची सेवा करणार, देशाला दिशा देणार आणि मी जिंकणार.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर : ‘निर्धार २०१९’ कार्यक्रमात युवकांना दिले जिंकण्याचे तंत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : काँग्रेसच्या काळात शेतकरी समाधानी होते. आता तर विदर्भाचेच मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांच्या समस्या सुटत नसल्याचे चित्र आहे. परंतु, क्षणिक सत्तेत आलेल्या पक्षात सद्यस्थितीत प्रवेशाची धूम सुरू आहे. जे काँग्रेस पक्षातून गेलेत ते कावळे, राहिलेत तेच खरे मावळे आहेत. गड जिंकण्यासाठी त्यांचेच बळ पुरेसे असल्याचा निर्धार काँगे्रसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार यशोमती ठाकूर यांनी येथे व्यक्त केला.तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात रविवारी ‘निर्धार २०१९’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या युवकांना मार्गदर्शन करीत होत्या. युवकांनो, आपण निर्धार केला पाहिजे, मी लढणार, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार, सामान्यजनांचे प्रश्न सोडविणार, जनतेची सेवा करणार, देशाला दिशा देणार आणि मी जिंकणार. तेव्हाच आपल्यामधील युवा जागा होईल आणि खºया अर्थाने जनतेला न्याय मिळेल, असे आवाहन आमदार यशोमती ठाकूर यांनी तरुणाईला केले.आ. यशोमती ठाकूर म्हणाल्या, काँग्रेस पक्षाने आपल्या सत्ताकाळात जनतेच्या हितार्थ कामे केली. आबालवृद्धांना काँग्रेसबद्दल आस्था होती, आहे आणि राहणार. कारण तत्कालीन पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रयत्नांमुळे संगणकाची मोठी क्रांती झालेली आहे.याप्रसंगी चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याशिवाय ‘मै भी नायक’ या स्पर्धेतून अमरावती जिल्ह्यातील आॅनलाईन व्होटिंगद्वारे निवड झालेल्या दोन युवकांना छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांसोबत एक दिवस कामकाज समजून घेण्याची संधी मिळाल्याने त्यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यक्रमाला भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, सरचिटणीस प्रतिभा रघुवंशी, जिल्हाध्यक्ष पंकज मोरे, भेया पवार, परीक्षित जगताप आदी प्रवक्ते व युवा काँग्रेसचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.तिवसा मतदारसंघातील भातकुली तालुका, तिवसा तालुक्यासह नांदगावपेठ परिसरातील हजारो युवकांची उपस्थिती होती. ते या कार्यक्रमातून सकारात्मक प्रेरणा, ऊर्जा घेऊन गेले.भाजप सरकारच्या काळात अत्याचार वाढलेआमचा निर्धार पक्का आहे. महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेसचा झेंडा फडकवूनच दाखवू, यासाठी प्रत्येक बूथवरून काँग्रेसला संधी देण्याची जबाबदारी युवकांची आहे. या जिल्ह्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी संत गाडगेबाबा, डॉ. भाऊसाहेब देशमुख यांच्यासारख्या थोर पुरुषांचा वारसा लाभला आहे. परंतु, जेव्हापासून राज्यात व देशात भाजपचे सरकार आले तेव्हापासून अन्याय, अत्याचार, गोरगरिबांवर वाढले आहे. अरबी समुद्रात शिवछत्रपतींचे स्मारक उभारण्याची वल्गना केली. मात्र, ते अद्याप पूर्णत्वास आले नाही. काँग्रेसने मात्र जनतेच्या हितार्थ निर्णय घेऊन ते पूर्णत्वास नेल्याची अनेक उदाहरणे सांगता येतील. आपली साथ मिळाल्यास राज्याचा विकास करूच, शिवाय देशालासुद्धा दिशा देण्याचा प्रयत्न आम्ही सुरूच ठेवू, असे आ. ठाकूर म्हणाल्या.

टॅग्स :congressकाँग्रेसYashomati Thakurयशोमती ठाकूर