शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. प्राथमिक शिक्षकांच्या विनंती बदल्याही बारगळल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 10:20 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या विनंतीवरील बदली प्रक्रिया न करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या विनंतीवरील बदली प्रक्रिया न करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असून, यासंदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (सीईओ) ७ आॅगस्ट रोजी ग्रामविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र पाठविले आहे. त्यामुळे कोरोना काळात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या विनंतीवरील बदल्याही आता बारगळल्या आहेत.शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत देण्यात आलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आॅफलाइन सार्वत्रिक बदल्यांची प्रक्रिया राबविण्याची तयारी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली होती; परंतु शिक्षकांच्या बदली प्रक्रियादरम्यान होणारी मोठ्या प्रमाणात गर्दी टाळण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया करण्यात येऊ नये आणि शिक्षकांच्या विनंतीवरील बदल्यांची प्रक्रिया समुपदेशनाद्वारे घेण्याचा आदेश शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत ५ आॅगस्ट रोजी राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आला. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यानंतर अकोला शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विनंतीवरील बदली प्रक्रिया करण्यात येऊ नये, अशी सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने व शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे पत्राद्वारे मांडली. त्यानुषंगाने जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विनंतीवरील बदल्या न करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे, असे पत्र जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्यामार्फत ७ आॅगस्ट रोजी ग्रामविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे पाठविण्यात आले. त्यामुळे कोरोना काळात जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्यांसह आता विनंतीवरील बदल्यादेखील बारगळल्या आहेत.

विनंती बदल्यांसाठी १४६ शिक्षकांचे अर्ज!जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या विनंतीवरील बदली प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील १४६ प्राथमिक शिक्षकांनी विनंतीवरील बदलीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे अर्ज केले होते; परंतु कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्राथमिक शिक्षकांच्या विनंतीवरील बदल्यांची प्रक्रियादेखील आता लांबणीवर पडली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद