शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. सर्वसाधारण सभा : निधी नियोजनावर वादंगाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 12:39 IST

सर्वसाधारण सभेत ठेवण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी केली असतानाच त्या प्रस्तावाला अर्थ समितीकडून मंजुरी नसल्याचा मुद्यावर सभेत गदारोळ होण्याची शक्यता

अकोला : जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचा अखर्चित निधी करण्यासाठीचे नियोजन  सर्वसाधारण सभेत ठेवण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी केली असतानाच त्या प्रस्तावाला अर्थ समितीकडून मंजुरी नसल्याचा मुद्यावर सभेत गदारोळ होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद उपकराचे (सेस) ९ कोटी १७ लाख अखर्चित आहेत. अर्थ विभागानेही उपकराच्या मुद्यांवर आक्षेप असल्याचे नमूद केल्याने उपकरासह इतर खर्चाच्या नियोजनाला मंजुरी मिळते की नाही, ही बाब आता महत्त्वाची ठरणार आहे.जिल्हा परिषदेला २०१६-१७ मध्ये प्राप्त निधी खर्च करण्याची मुदत ३१ मार्च २०१८ रोजी संपुष्टात आली. या मुदतीनंतर अखर्चित निधी ३० जून २०१८ पर्यंत शासनजमा करण्यात आला. सोबतच २०१७-१८ मध्ये प्राप्त निधी खर्च करण्याला ३१ मार्च २०१९ पर्यंतची मुदत होती. त्यापैकी निधी अखर्चित आहे. जिल्हा परिषदेला गेल्या दोन वर्षांपासून रस्ते निर्मिती, दुरुस्तीच्या कामांसाठी शासनाकडून ७ कोटी ४४ लाख रुपये ३१ मार्च २०१९ पर्यंत खर्च करण्याची मुदत होती. त्यापैकी किती खर्च झाले, याचा हिशेब अद्याप जुळलेला नाही. त्यासोबतच शासनाने विविध योजना, विकास कामांसाठी दिलेल्या १८३ कोटी २२ लाख रुपये निधीपैकी किती खर्च झाला, याचाही ताळमेळ अद्याप अर्थ विभागाकडे उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे हा निधी सध्यातरी अखर्चित असल्याने तो पुढील वर्षात खर्च करण्याचे नियोजन आवश्यक आहे. त्यापैकी उपकराचा निधी खर्च करण्याच्या नियोजनाला अर्थ समितीकडून मंजुरी घेतल्यानंतर सर्वसाधारण सभेत ठेवता येईल, अशी अर्थ विभागाने फायलीवर नोंद केली. त्यामुळे उद्या सर्वसाधारण सभेत या मुद्यावर गदारोळ होण्याची शक्यता आहे.- शासनाकडून प्राप्त निधीशिक्षण विभाग- ११.१३ कोटी, बांधकाम- १८.५१ कोटी, लघुसिंचन- १७.२५ कोटी, पाणी पुरवठा- ३२.३ कोटी, आरोग्य- ४.६२ कोटी, कृषी- ७.४० कोटी, पशुसंवर्धन- ७.९७ कोटी, महिला बालकल्याण- १.२८ कोटी, पंचायत- ५.५५ कोटी, पाणी व स्वच्छता- ३४.६९, समाजकल्याण- ४२.७४ कोटी निधी प्राप्त झाला. हा सर्व निधी कोषागारातून काढण्यात आला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद