शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

जि.प.च्या दुधाळ जनावरे वाटप योजनेत घोळ!

By admin | Updated: May 24, 2017 01:40 IST

कागदोपत्री खरेदी : लाभार्थींकडे म्हशी नसल्याचा कृषी-पशुसंवर्धन सभापतींचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विशेष घटक योजनेंतर्गत जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या दुधाळ जनावरे वाटप योजनेत जिल्ह्यातील तालुका स्तरावर म्हशींची कागदोपत्री खरेदी दर्शविण्यात आली असून, वाटप करण्यात आलेल्या म्हशी लाभार्थ्यांकडे उपलब्ध नसल्याचा आरोप खुद्द जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती माधुरी गावंडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (सीईओ) दिलेल्या पत्रात केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या दुधाळ जनावरे वाटप योजनेत घोळ झाल्याची बाब समोर येत आहे. विशेष घटक योजनेंतर्गत सन २०१६-१७ या वर्षात जिल्हा परिषद पशुसंंवर्धन विभागामार्फत दोन कोटी रुपयांच्या निधीतून दुधाळ जनावरे वाटपाची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत विभागामार्फत जिल्ह्यातील ३१७ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून, गत मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील २८० लाभार्थ्यांना प्रत्येकी एक प्रमाणे ४० हजार रुपये किमतीच्या म्हशींचे वाटप करण्यात आले. तीन महिन्याच्या कालावधीत संबंधित लाभार्थ्यांना आणखी प्रत्येकी एक म्हैस याप्रमाणे वाटप करावयाचे आहे. दरम्यान, दुधाळ जनावरे वाटप योजनेंतर्गत जिल्ह्यातील तालुका स्तरावर पशुसंवर्धन विभागाच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांनी म्हशींची कागदोपत्री खरेदी दर्शवून, प्रत्यक्षात म्हशींची खरेदी करण्यात आली नाही; तसेच खरेदी प्रक्रियेच्या माहितीच्या आधारे संबंधित लाभार्थ्यांकडे चौकशी केल्यास, लाभार्थ्यांकडे म्हशी उपलब्ध नाहीत; परंतु ज्यांच्याकडे म्हशी नाहीत; अशा व्यक्तींकडून म्हैस खरेदी केल्याबाबतचे दाखले मात्र घेण्यात आले, असा आरोप खुद्द जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती माधुरी गावंडे यांनी २२ मे रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (सीईओ) दिलेल्या पत्रात केला आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या दुधाळ जनावरे वाटप योजनेत घोळ झाल्याची बाब समोर येत आहे.सभापतींची ‘सीईओं’कडे चौकशीची मागणी ! जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या दुधाळ जनावरे वाटप योजनेतील म्हशींच्या खरेदी प्रक्रियेसह लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या म्हशींबाबत तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही कृषी व पशुसंवर्धन सभापती माधुरी गावंडे यांनी ‘सीईओं’कडे पत्राद्वारे केली आहे.दुधाळ जनावरे वाटप योजनेत मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून, लाभार्थींवर अन्याय झाला आहे. त्यामुळे यासंदर्भात चौकशी करून, संबंधितांविरुद्ध कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.- माधुरी गावंडे, सभापती, कृषी व पशुसंवर्धन, जिल्हा परिषद दुधाळ जनावरे वाटप योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी २८० लाभार्थ्यांना म्हशींचे वाटप करण्यात आले आहे. वाटप करण्यात आलेल्या म्हशी लाभार्थ्यांकडे आहेत की नाही, यासंदर्भात पशुधन विकास अधिकाऱ्यांकडून (विस्तार) पडताळणी करण्यात येणार आहे.-केशव मेहरे, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद.