शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांत शाळा जिल्हा परिषदेच्या १५ शाळा पडल्या बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 13:23 IST

अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये काही गावांतील विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने त्या बंद करण्याची वेळ आली. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील १५ शाळा बंद पडल्या असून, त्या सुरू करण्यासाठी कर्मचारी संघटना सरसावल्या आहेत.

अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये काही गावांतील विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने त्या बंद करण्याची वेळ आली. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील १५ शाळा बंद पडल्या असून, त्या सुरू करण्यासाठी कर्मचारी संघटना सरसावल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकत्याच झालेल्या बैठकीचे पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले आहे.ग्रामीण भागात कॉन्व्हेंट संस्कृतीचे लोण पोहोचले, तसेच वाहतुकीची साधने वाढल्याने शहर, ग्रामीण भागाचे अंतर कमी झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी सर्रासपणे शहरी भागातील शाळांमध्ये दाखल होत आहेत. त्यातच जिल्हा परिषद शाळांतील शिक्षणाचा दर्जाही घसरला. त्याचाही परिणाम, शाळांतील विद्यार्थी प्रवेशावर होत आहे. काही गावांची लोकसंख्याही कमीच असल्याने २० पर्यंत विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या सर्व बाबींच्या परिणामी, २०१७ ते आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या १५ शाळा बंद करून इतर शाळांमध्ये जोडण्यात आल्या. त्या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लगतच्या शाळेत धाव घ्यावी लागत आहे. जिल्हा परिषदेच्या संचमान्यतेनुसार शिक्षकांची पदेही घटली आहेत. याबाबतची माहिती पुन्हा शासनाने मागविल्यावर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पाठविली आहे.- गरिबांचे शिक्षण, शिक्षकांची पदे वाचवा!मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कास्ट्राइब कर्मचारी संघटनेसोबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेने बंद केलेल्या शाळांचा मुद्दा उपस्थित केला. त्यामध्ये जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी असल्याने शाळांना कुलूप लावण्यात आले. शाळांमध्ये विद्यार्थी घडत असतात म्हणून त्या सुरू ठेवाव्या, अशी मागणी केली. बैठकीला कास्ट्राइब संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ उपस्थित होते. त्या इतिवृत्तानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेला पत्र देत कार्यवाही करण्याचे सांगितले आहे.

- बंद पडलेल्या प्राथमिक शाळाकमी पटसंख्येमुळे बंद पडलेल्या शाळांची संख्या जिल्ह्यात १५ आहे. त्यापैकी काही शाळांतील विद्यार्थी संख्या शून्य ते १० पर्यंत आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा सोनाळा-०८, साहित-०८, मालपुरा-७, लखमापूर-१०, मोझरी-४, उर्दू शाळा जामठी बु.-३, ठोकबर्डी-७, अडोशी-१०, वणी-४, कवठा खुर्द-६, सर्व विद्यार्थी संख्या शून्य असलेल्या शाळांमध्ये राजापूर, एडली, व्याळा उर्दू, खांबोरा गावांचा समावेश आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदSchoolशाळा