शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या २८ जुलैपासून ‘ऑफलाइन’ बदल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 10:25 IST

शिक्षकांच्या ‘ऑफलाइन’ बदल्या करण्याची प्रक्रिया २८ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहेत.

अकोला : जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ‘ऑफलाइन’ बदल्या करण्याची प्रक्रिया २८ जुलैपासून सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी जिल्ह्यातील बदलीपात्र प्राथमिक शिक्षकांच्या याद्या सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना (बीईओ) दिले.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची सार्वत्रिक बदली प्रक्रिया दरवर्षी मे महिन्यात राबविण्यात येते; मात्र यावर्षी कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया लांबणीवर पडली होती. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या ऑनलाइन न करता, आॅफलाइन पद्धतीने करण्याचे निर्देश शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत १५ जुलै रोजी देण्यात आलेले निर्देश जिल्हा परिषदेला प्राप्त झाले. त्यानुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑफलाइन बदल्या करण्याची प्रक्रिया २८ ते ३१ जुलैदरम्यान जिल्हा परिषद प्रशासनामार्फत राबविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील कार्यरत प्राथमिक शिक्षकांपैकी बदलीपात्र व बदली अधिकारी पात्र प्राथमिक शिक्षकांच्या याद्या २१ जुलैपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी १७ जुलै रोजी जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या गटशिक्षणाधिकाºयांना पत्राव्दारे दिले आहेत.

शिक्षकांच्या बदली प्रक्रियेचे असे आहे वेळापत्रक!जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेचे वेळापत्रक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील बदलीपात्र शिक्षकांची माहिती २२ जुलै रोजी जिल्हास्तरावर संकलित करण्यात येणार असून, बदलीपात्र शिक्षकांची तात्पुरती यादी शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २४ ते २६ जुलैपर्यंत बदलीपात्र शिक्षकांच्या यादीवर आक्षेप घेता येतील. आक्षेप दुरुस्तीनंतर २७ जुलै रोजी बदलीपात्र शिक्षकांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, २८ ते ३१ जुलैदरम्यान प्रत्यक्ष बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक