शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद, स्थानिक स्तर विभागाची टोलवाटोलवी

By admin | Updated: November 18, 2016 02:09 IST

कोल्हापुरी बंधा-यांचा कागदोपत्री फार्स

अकोला, दि. १७- शेतकर्‍यांच्या निम्म्यापेक्षा अधिक समस्यांवरचा उपाय असलेल्या सिंचनाच्या सोयीकडे शासनासह जिल्हा परिषद, लघुपाटबंधारे स्थानिक स्तर विभाग किती सहजतेने दुर्लक्ष करीत आहेत, ही बाब गेल्या अनेक वर्षांंंंपासून प्रत्यक्षात काम न करता केलेल्या कागदोपत्री फार्सवरून दिसत आहे. स्थानिक स्तरकडे दिलेले तब्बल ८४ पैकी ७0 बंधारे अद्यापही जिल्हा परिषदेकडे नाहीत. एवढेच काय, त्याची माहितीही जिल्हा परिषदेत नसल्याचा गंभीर प्रकार उघड होत आहे. त्याचवेळी बंधारे हस्तांतरणासाठी स्थानिक स्तरकडून पत्रव्यवहार सुरू असल्याचे दाखविले जाते, हा विरोधाभासही घडत आहे. जिल्हा परिषदेच्या ८४ बंधार्‍यांची कामे स्थानिक स्तरकडे देण्यात आली. त्यापैकी केवळ १४ कामे जिल्हा परिषदेला हस्तांतरित केली. उर्वरित कामे हस्तांतरित करा, असे जिल्हा परिषदेने सातत्याने या विभागाला सांगितल्याचा दावा केला जात आहे. लघुसिंचन विभागाने लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर) या विभागाकडे २00४-0५ मध्ये सोपविलेली कामे अद्यापही अपूर्ण आहेत. त्यावर एक कोटी रुपये खर्च झाले आहेत; मात्र ती कामे अपूर्ण असल्याने सिंचनासाठी त्याचा कुठलाही लाभ झालेला नाही. त्या चार कामांसोबत इतरही नऊ कामांमध्ये एकूण १ कोटी ८८ लाख रुपये निधी अडकलेला आहे. ही कामे देताना झालेल्या बी-१ करारनाम्यातील अट क्रमांक तीनचा भंग करण्यात आला. वेळेत काम पूर्ण करणे बंधनकारक असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. एकीकडे हे चित्र असताना स्थानिक स्तर विभागाने बंधारे हस्तांतरणासाठी सातत्याने पत्रव्यवहार केल्याचे म्हटले आहे; मात्र जिल्हा परिषद दाद देत नसल्याचे त्या विभागाचे म्हणणे आहे. एप्रिल २0१४ पासून पत्रव्यवहारजिल्हा परिषदेकडून बंधारे हस्तांतरणासाठी मागणी सुरू आहे. असे असताना स्थानिक स्तरने २९ एप्रिल २0१४ पासून ७ नोव्हेंबर २0१६ या काळात तब्बल सात पत्रे पाठवून बंधारे हस्तांतरित करून घेण्याची आठवण जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाला करून दिली आहे; मात्र यामध्ये नेमके काय घडत आहे, बंधारे हस्तांतरण का रखडले, याकडे पाहता दोन्ही विभागाचा सुरू असलेला कागदोपत्री फार्स असल्याचेच दिसत आहे. सर्वाधिक पावसानंतरही बंधार्‍यात पाणी नाही यावर्षी गेल्या काही वर्षांंंंंच्या तुलनेत चांगलाच पाऊस झाला आहे. त्या पावसाने धरणे, तलाव तुडुंब आहेत. त्याचवेळी जिल्हा परिषदेच्या कोल्हापुरी बंधार्‍यांत थेंबभर पाणीही नाही, ही शोकांतिकाही आहे.