शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा पोळा फुटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 10:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक प्रशासकीय व विनंतीवरील बदल्यांचा पोळा शुक्रवारी फुटला. ...

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक प्रशासकीय व विनंतीवरील बदल्यांचा पोळा शुक्रवारी फुटला. समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी (शुक्रवारी) १३ कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये ४ प्रशासकीय व ९ कर्मचाºयांच्या विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या.जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग -३ व वर्ग -४ मधील कर्मचाºयांच्या प्रशासकीय व विनंतीवरील बदल्यांची प्रक्रिया ३१ जुलैपासून सुरू करण्यात आली. जिल्हा परिषद सभागृहात समुपदेशनाद्वारे सहा विभागातील कर्मचाºयांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. कृषी, बांधकाम, लघुसिंचन, अर्थ, पाणीपुरवठा व पशुसंवर्धन इत्यादी सहा विभागातील १३ कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये ४ कर्मचाºयांच्या प्रशासकीय व ९ कर्मचाºयांच्या बदल्या विनंतीवरून करण्यात आल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, संबंधित विभागाचे सभापती व विभाग प्रमुख अधिकाºयांच्या उपस्थितीत समुपदेशनाद्वारे कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या.शिक्षकांच्या बदल्यांचे मंगळवारी ठरणार नियोजन!जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेचे नियोजन मंगळवारी ठरविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संबंधित विभागाचे अधिकारी आणि पदाधिकाºयांची बैठक घेणार असून, या बैठकीत जिल्ह्यातील बदलीपात्र प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेचे नियोजन निश्चित करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी सांगितले.

विभागनिहाय अशा आहेत बदल्या!जिल्हा परिषद कृषी विभागातील १ विस्तार अधिकारी, लघुसिंचन विभागातील १ शाखा अभियंता, बांधकाम विभागातील विभागातील १ कनिष्ठ अभियंता व २ स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, अर्थ विभागातील १ कनिष्ठ सहायक लेखा व २ वरिष्ठ सहायक लेखा, पाणीपुरवठा विभागातील १ कनिष्ठ अभियंता आणि पशुसंवर्धन विभागातील १ सहायक पशुधन विकास अधिकारी व ३ पशुधन पर्यवेक्षक इत्यादी कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या.

चार मोठ्या विभागातील बदल्या ५ आॅगस्टला!जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या बदली प्रक्रियेत आरोग्य, पंचायत, शिक्षण व सामान्य प्रशासन इत्यादी चार मोठ्या विभागातील कर्मचाºयांच्या बदल्या ५ आॅगस्ट रोजी करण्यात येणार आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद