शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेड (मो.) येथील जिल्हा परिषद शाळेलाही आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची संलग्नता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 13:03 IST

अकोला: वाडेगाव येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेला महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने संलग्नता प्रदान केल्यानंतर आता सिंदखेड मोरेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेलासुद्धा ही संलग्नता मिळाली आहे.

अकोला: वाडेगाव येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेला महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने संलग्नता प्रदान केल्यानंतर आता सिंदखेड मोरेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेलासुद्धा ही संलग्नता मिळाली आहे. यंदा जिल्ह्यातील दोन शाळांना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यास मदत होणार आहे.डिजिटल शाळेसोबत वैविध्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शाळांना आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता देत, तेथील गुणवंत विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भौतिक सुविधा, अभ्यासक्रम, प्रशिक्षित शिक्षक मिळावे, या दृष्टिकोनातून शासनाने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ कार्यरत आहे. या मंडळाची संलग्नता देऊन आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा देण्यासाठी मंडळाने आॅनलाइन अर्ज मागविले होते. यात जिल्ह्यातील पाच शाळांची मंडळाने निवड केली. या पाच शाळांच्या बाह्य मूल्यांकनासाठी राज्यस्तरीय शाळा मूल्यांकन समितीच्या सहा सदस्यीय चमूने ४ ते ७ फेब्रुवारीदरम्यान पाच शाळांची तपासणी केली.तपासणीमध्ये वाडेगाव येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेसोबतच, सिंदखेड मोरेश्वर येथील जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळा संलग्नतेसाठी आवश्यक असलेले सर्व निकष पूर्ण केल्यामुळे या शाळेला महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने पुढील तीन वर्षांपासून अस्थायी संलग्नता प्रदान केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुला-मुलींना आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमानुसार शिक्षण मिळणार आहे. या शाळेमध्येसुद्धा कॉन्व्हेंट सुरू होऊन नर्सरी ते चौथीपर्यंत आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची संलग्नता मिळाल्यामुळे वाडेगाव जि.प. शाळेत आता नर्सरी, केजी-१, केजी-२ पर्यंत कॉन्व्हेंट सुरू होईल. पहिल्या टप्प्यामध्ये नर्सरी ते इ. चौथीतील विद्यार्थ्यांना मंडळाच्या आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमानुसार शिक्षण मिळणार आहे.शाळेतील मुलांच्या या परीक्षा होतील!तीन वर्षांमध्ये शाळेला आपली पात्रता सिद्ध करावी लागणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या काही परीक्षा होतील. २0२१ ते २0२३ या कालावधीत प्रोग्रेस इंटरनॅशनल रिडिंग लिटरसी स्टडी (पीआयआरएलएस), ट्रेंड्स इन इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स टाइम स्टडी आणि प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट या परीक्षा होतील. शाळेतील विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले, तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये टिकण्यास पात्र ठरतील.यामुळे मिळाली संलग्नता!सिंदखेड मोरेश्वर येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा लोकसहभागातून डिजिटल झाली. इ. १ ते ७ पर्यंत असलेल्या शाळेत २२२ विद्यार्थी आहेत. एचडीएफसी बँकेच्या १0 लाख रुपयांच्या अर्थसाहाय्यामुळे शाळेत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.

आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची संलग्नता मिळालेली सिंदखेड येथील जि.प. शाळा जिल्ह्यात दुसरी आहे. मुख्याध्यापक, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळेच शाळेला तीन वर्षांसाठी अस्थायी आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता मिळाली.-डॉ. प्रकाश जाधव,प्राचार्य, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था.लोकसहभागामुळे शाळेचा विकास झाला. अ‍ॅप्रो कंपनीने मदतीचा हात दिल्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधेसोबत अत्याधुनिक शौचालय, बोलक्या भिंती, वाचनालय, फर्निचर, आरओ प्लांटसारख्या सुविधा उपलब्ध झाल्या. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल वाघ, उपाध्यक्ष शेखर खुणे यांच्यासह ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभले.-अरुण वानखडे, मुख्याध्यापक,जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सिंदखेड मोरेश्वर.

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा