शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पाेटनिवडणूक : शिवसेना राष्ट्रवादी एकत्र लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 11:06 IST

Zilla Parishad, Panchayat Samiti by-elections: शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांचीच आघाडी अंतिम झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अकाेला : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पाेटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांना एकत्र लढण्याच्या प्रयत्नांना काँग्रेसच्या स्वबळाचा अडसर ठरला असून, शिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेस यांचीच आघाडी अंतिम झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पाेटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये गेल्या आठवड्यापासून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. पहिल्या बैठकीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल हे उपस्थित हाेते; मात्र त्याच दिवशी दुपारी काँग्रेसच्या बैठकीत त्यांनी स्वबळाचा नारा दिल्याने आघाडीत काँग्रेसचा सहभाग हाेण्याची शक्यता मावळली हाेती. त्यामुळे मुंबईत राष्ट्रवादीचे मंत्री डाॅ. राजेद्र शिंगणे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत काँग्रेसला वगळूनच जागा वाटपावर चर्चा झाली. आमदार नितीन देशमुख, जिल्हा परिषदेचे विराेधी पक्षनेते गाेपाल दातकर, राष्ट्रवादीचे आमदार अमाेल मिटकरी, माजी आमदार तुकाराम बिडकर व जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्यामध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या रंगल्या. अखेर शुक्रवारी आघाडी अंतिम झाली असून, हे दाेन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढणार हे निश्चित झाले आहे. या संदर्भात शनिवारी घाेषणा हाेण्याची शक्यता आहे.

असे आहे जागा वाटपाचे सूत्र

जिल्हा परिषदेच्या १४ जागांपैकी १० जागा शिवसेना व ४ जागा राष्ट्रवादी काँग्रेस असे सूत्र ठरले आहे; मात्र राष्ट्रवादीला आणखी एक जागा वाढवून देण्याबाबत नेते आग्रही आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला एक जागा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाले तर सेनेच्या नऊ जागांपैकी प्रहारला एक किंवा दाेन जागा साेडाव्या लागणार आहेत.

 

केवळ एक जागा हीच काँग्रेसची अडचण

जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या १४ जागांमध्ये काँग्रेसची एक जागा कमी झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सहभाग घेतल्यावरही काँग्रेसला केवळ एकच जागा साेडण्याबाबत शिवसेना आग्रही हाेते. अशा स्थिती एक जागा घेऊन आघाडीत लढण्यापेक्षा स्वतंत्र लढणे काँग्रेससाठी फायद्याचेच आहे. दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांच्या स्वबळाचा नाराही आजमावण्याची संधी या निमित्ताने काँग्रेसला मिळणार आहे.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस