शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
5
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
6
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
7
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
8
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
9
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
10
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
11
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
12
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
13
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
14
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
15
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
16
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
17
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
18
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
19
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
20
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळणार-  प्रकाश आंबेडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 15:00 IST

नागपूर जिल्हा परिषदेची मुदत मार्च २०१७ मध्ये संपुष्टात आल्यानंतर तेथील पदाधिकाºयांना मुदतवाढ देण्यात आली आहे. तोच न्याय अकोला, वाशिम, धुळे, नंदूरबार जिल्हा परिषदांनाही द्यावा लागणार आहे. त्यामुळे शासनाला सद्यस्थितीतील सदस्यांना मुदतवाढ द्यावी लागेल, असे भारिप-बमसंचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांना सांगितले.

अकोला : जिल्हा परिषदेची मुदत ३० डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे. या परिस्थितीत प्रशासक नेमण्याची तरतूद महाराष्ट्र जिल्हा परिषद, पंचायत समित्या अधिनियमामध्ये नाही. नागपूर जिल्हा परिषदेची मुदत मार्च २०१७ मध्ये संपुष्टात आल्यानंतर तेथील पदाधिकाºयांना मुदतवाढ देण्यात आली आहे. तोच न्याय अकोला, वाशिम, धुळे, नंदूरबार जिल्हा परिषदांनाही द्यावा लागणार आहे. त्यामुळे शासनाला सद्यस्थितीतील सदस्यांना मुदतवाढ द्यावी लागेल, असे भारिप-बमसंचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांना सांगितले.मंगळवारी दुपारी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर सुलताने, माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभा सिरसाट, संघटक शोभा शेळके, पश्चिम महानगर अध्यक्ष सिमांत तायडे, वंदना वासनिक उपस्थित होत्या.जिल्हा परिषदेची मुदत ३० डिसेंबरपर्यंत होण्याची शक्यता मावळली आहे. या परिस्थितीत जिल्हा परिषदेचा कारभार चालवण्यासाठी शासनाकडून प्रशासक नेमला जाण्याची शक्यता आहे. यावर अ‍ॅड. आंबेडकर यांनी ती शक्यता फेटाळली. महाराष्ट्र जिल्हा परिषद, पंचायत समित्या अधिनियम १९६१ मध्ये प्रशासक नेमण्याची तरतूद नाही. त्यामुळे सद्यस्थितीत अस्तित्त्वात असलेल्या सभागृह सदस्यांना मुदतवाढ द्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे, शासनाने नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक पुढे ढकलत मुदतवाढ दिली. त्यासाठी प्रशासक नेमला नाही. सभागृहालाच मुदतवाढ दिली आहे. तोच न्याय राज्यातील चार जिल्हा परिषदांनाही द्यावा लागणार आहे, असे अ‍ॅड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा प्रसिद्धीप्रमुख डॉ. प्रसन्नजित गवई, विलास जगताप, महादेव सिरसाट, सम्राट सुरवाडे, पराग गवई, सम्राट तायडे उपस्थित होते.

तर आम्हाला राष्ट्रवादी चालत नाही..आघाडीच्या प्रस्तावात काँग्रेसच्या नेत्यांना वंचित बहुजन आघाडीमध्ये एमआयएम चालत नसल्याचे ऐकिवात आहे. तसे असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबतची आघाडी आम्हाला पसंत नाही, असेही अ‍ॅड. आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर