शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणूक न्यायालयाच्या परवानगीशिवाय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 12:33 IST

अकोला: अकोला, वाशिम जिल्हा परिषदेची प्रभाग रचना, आरक्षणाची प्रक्रिया सुरूच ठेवून त्यापुढील निवडणूक कार्यक्रमाची घोषणा न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय करता येणार नाही, असे बंधन निवडणूक आयोगाला घालून देण्यासोबत याप्रकरणी पुढील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात २६ जून रोजी होणार आहे.

अकोला: अकोला, वाशिम जिल्हा परिषदेची प्रभाग रचना, आरक्षणाची प्रक्रिया सुरूच ठेवून त्यापुढील निवडणूक कार्यक्रमाची घोषणा न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय करता येणार नाही, असे बंधन निवडणूक आयोगाला घालून देण्यासोबत याप्रकरणी पुढील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात २६ जून रोजी होणार आहे. त्या दिवशी अंतिम सुनावणीसाठीचे स्पष्टीकरण राज्याचे महाधिवक्ता, शासन, निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आले आहे.महाराष्ट्र जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियमातील कलम १२(२)(सी) नुसार दिले जाणारे आरक्षण ५० टक्क्यांच्या अधिक दिले जात आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर न्यायालयाने २७ आॅगस्ट २०१८ रोजी राज्य सरकारला अधिनियमातील तरतुदीत आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देत अकोला, वाशिम, नंदुरबार व धुळे जिल्हा परिषदांची निवडणूक प्रक्रिया यथास्थिती ठेवण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर शासनाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियमातील तरतुदीमध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव विधिमंडळापुढे ठेवण्यात आला, असे सांगितले. शासनाकडून कार्यवाहीचा अहवाल तीन महिन्यांत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्याची मुदत २७ नोव्हेंबर २०१८ रोजी संपुष्टात आली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यास घटनेतील ७३ व ७४ व्या दुरुस्तीनुसार कोणतेही बंधन नाही, असे स्पष्ट करीत आयोगाने वाशिम, अकोला व नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक प्रक्रिया स्वतंत्रपणे सुरू केली. ३० मार्च २०१९ रोजी आयोगाने प्रभार रचना, आरक्षण प्रक्रियाही सुरू करण्याचा आदेश दिला. त्या आदेशामुळे ठरवले जाणारे आरक्षण यापूर्वी न्यायालयात दाखल याचिकेतील मागणी, शासनाने सादर केलेल्या स्पष्टीकरणाला छेद देणारे आहे. आरक्षित जागांची संख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक होत असल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग ठरणार आहे. त्यामुळे याप्रकरणी अंतिम निर्णयासाठी राज्याचे महाधिवक्ता, निवडणूक आयोग, राज्य शासनाला नोटीस बजावण्यात आली. २६ जून रोजी त्यावर खंडपीठात सुनावणी होणार आहे. दरम्यानच्या काळात आरक्षणाच्या तरतुदीत बदल झाल्यास निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवण्याची मुभाही न्यायालयाने दिली आहे. 

जिल्हा परिषद सदस्य गवळी यांचा पाठपुरावायाप्रकरणी वाशिम जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी यांनी सातत्याने न्यायालयात धाव घेत आरक्षणाच्या तरतुदीत बदल करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे राज्य शासनाला कायद्यात बदल करावा लागणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद