शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

म्हणे, जिल्हा परिषदेची शेगावातील जमीन हरविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 13:09 IST

मोजणीच्या वेळी जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जमीन न दाखविल्याने मोजणी रद्द केल्याचे पत्रही भूमी अभिलेख विभागाने दिले आहे.

 - सदानंद सिरसाटअकोला: जिल्हा कौन्सिलच्या नावे असलेल्या जमिनीची मोजणी करून देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून ४८ हजार रुपये शुल्क भरून घेतल्यानंतर कोणती जागा मोजावयाची आहे, ती शोधून द्या, असा पवित्रा शेगाव येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयाने घेतला आहे. या प्रकाराने जमीन हरविली असून, ती शोधून देण्याची जबाबदारी आता जिल्हा परिषदेची आहे, या टप्प्यावर प्रकरण थांबले आहे. विशेष म्हणजे, मोजणीच्या वेळी जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जमीन न दाखविल्याने मोजणी रद्द केल्याचे पत्रही भूमी अभिलेख विभागाने दिले आहे.शेगावातील भाग दोनमध्ये सर्व्हे क्रमांक ३४३ (४) मध्ये ०.८३ आर क्षेत्रफळ असलेली जमीन अकोला जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. त्या जमिनीची मोजणी करून देण्यासाठी जिल्हा परिषदेने भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयात अर्ज केला. जमिनीची ई-मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने ४८ हजार रुपये शुल्कही भरून घेतले. त्यासाठी १ आॅक्टोबर २०१८ रोजी मोजणी ठेवण्यात आली. अकोला जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी म्हणून बाळापूर पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता वामन राठोड, विजय शिंदे उपस्थित होते. भूमी अभिलेख विभागाचे भूमापक विनोद मेमाने यांनी सात-बारातील डिस्ट्रिक कौन्सिल अकोला नावे असलेल्या जमिनीचा पोटहिस्सा कोणता आहे, याची माहिती विचारली तसेच पोटहिश्श्याची ताबा वहिवाट विचारली; मात्र उपस्थित प्रतिनिधींनी माहिती न दिल्याने जमिनीची मोजणी करता आली नाही. त्यामुळे मोजणी न करताच परत यावे लागले. त्यानंतर ३१ आॅक्टोबर २०१८ रोजी पुन्हा मोजणी ठेवण्यात आली. त्यावेळी जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी म्हणून आधीच्या दोघांसह रमेश नागलकर उपस्थित होते. त्यावेळीही संबंधित प्रतिनिधींनी ताबा वहिवाट दाखविली नाही. त्यामुळे भूमापक मेमाने यांना मोजणी न करताच परत जावे लागले.- प्रकरण काढले निकालीकोणत्याही जागेची मोजणी करताना अर्जदाराने ताबा वहिवाट दाखविणे अनिवार्य आहे. ही बाब मोजणीच्या नोटीसमध्येही नमूद आहे; मात्र जिल्हा परिषदेच्या प्रतिनिधींनी मोजणीच्या दिवशी पोटहिस्सा ताबा वहिवाट न दाखविल्याने मोजणी झाली नाही. त्यामुळे प्रकरण निकाली काढण्यात येत आहे, असे पत्र भूमी अभिलेख उपअधीक्षक यांनी ७ मार्च २०१९ रोजी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला दिले आहे.- बांधकाम विभाग म्हणतो, मोजणी करून द्या...भूमी अभिलेख विभागाच्या पत्रानंतर बांधकाम विभागानेही प्रत्युत्तर दिले आहे. प्रथम मोजणीच्या शेतात पिके होती. दुसºया मोजणीच्या वेळी एकचलागूधारक उपस्थित होता. खुणा मिळाल्या नाहीत, त्यावेळी मोजणीच केली नाही. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या जमीन पोटहिश्श्यालगतच्या चतु:सीमा स्पष्टपणे देण्यात आल्या. तरीही मोजणी न करता प्रकरण निकाली काढणे, शासकीयदृष्ट्या योग्य नाही. जमिनीची मोजणी करून द्यावी, असे पत्र बांधकाम विभागाने २३ एप्रिल रोजी दिले आहे.

- जमिनीलगतचे खातेदारजिल्हा परिषदेच्या जमिनीच्या चतु:सीमामध्ये पूर्वेस-उत्तरेस शांतीलाल देवीचंद जैन, शैलजा जैन, पश्चिमेस साईनाथ डेव्हलपर्स, दक्षिणेस संजय भगवानदास नागपाल व इतर आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद