शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणूक : उमेदवारीसाठी ‘वंचित’च्या इच्छुकांमध्ये रस्सीखेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 14:08 IST

उमेदवारी मिळविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुक उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आॅनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १८ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यानुषंगाने वंचित बहुजन आघाडीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुक उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.अकोला जिल्हा परिषदेचे ५३ गट आणि अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही पंचायत समित्यांच्या १०६ गणांच्या निवडणुकीसाठी ७ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी आॅनलाइन उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या पृष्ठभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हा परिषद व त्यांतर्गत सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये सोयीच्या ठरणाऱ्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची उमेदवारी मिळविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुक उमेदवारांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. संबंधित जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणातून पक्षाची उमेदवारी आपल्यालाच मिळावी, यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक इच्छुक उमेदवारांसह गट आणि गणाच्या क्षेत्राबाहेरील इच्छुक उमेदवारांकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. दावे-प्रतिदावे करणाºया इच्छुक उमेदवारांच्या गर्दीने उमेदवारी मिळविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुक उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.

जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटात दहापेक्षा जास्त दावेदार!जिल्हा परिषद निवडणुकीत सोयीच्या ठरणाºया जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुक उमेदवारांनी प्रयत्न चालविले आहेत. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटात उमेदवारीसाठी इच्छुक दहापेक्षा जास्त उमेदवार दावेदार आहेत. त्यामध्ये संबंधित जिल्हा परिषद गटातील स्थानिक आणि गटाच्या क्षेत्राबाहेरील इच्छुक उमेदवारांचा समावेश आहे.

 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAkola ZPअकोला जिल्हा परिषद