शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणुकीचा संभ्रम कायम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 13:16 IST

चार जिल्हा परिषदांची निवडणुक प्रक्रीया सुरू होण्याबद्दल संभ्रम निर्माण झाला.

अकोला : अकोला- वाशिम जिल्हा परिषद निवडणुक आरक्षित जागांच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने निवडणुक प्रक्रीया यथास्थिती ठेवण्याचा आदेश दिला. त्यानंतर याच विषयाचा संदर्भ असलेल्या नंदूरबार जिल्हा परिषदेच्या प्रक्रीयेतील तीन याचिका औरंगाबाद खंडपिठाने नाकारल्याचा निर्णय दिल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे चार जिल्हा परिषदांची निवडणुक प्रक्रीया सुरू होण्याबद्दल संभ्रम निर्माण झाला. विशेष म्हणजे, नंदूरबार जिल्हा परिषदेच्या प्रक्रीयेसंदर्भात दाखल याचिकेवर १८ सप्टेंबर रोजी सुनावणी होत आहे, असे निवडणुक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.महाराष्ट्र जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियमातील कलम १२ (२) नुसार निवडणुकीमध्ये दिल्या जाणारे आरक्षण ५० टक्क्यांच्या वर जाते. त्यानुसारच अकोला, वाशिम जिल्हा परिषदेची निवडणूक प्रक्रियाही सुरू झाली. हा प्रकार नियमबाह्य आहे. तो थांबवण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी, या मागणीची याचिका वाशिम जिल्हा परिषद सदस्य विकास किसनराव गवळी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली होती. सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २७ आॅगस्ट रोजी या दोन्ही जिल्हा परिषदांची निवडणूक प्रक्रिया यथास्थिती ठेवा, कायद्यातील ज्या तरतुदीमुळे आरक्षित जागांची संख्या वाढते, त्यामध्ये तीन महिन्यात दुरुस्ती करून प्रक्रिया राबवावी, असे निर्देश दिले. त्यानुसार अकोला-वाशिम जिल्हा परिषदांची निवडणूक प्रक्रिया थांबलेली आहे.दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात नंदूरबार जिल्हा परिषदेची प्रभाग रचना, आरक्षणासंदर्भात तिघांनी याचिका दाखल केली. त्यावर पुढील सुनावणी १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. तर धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दिली. अकोला-वाशिम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबतचा निर्णय कायद्यातील तरतुदींमध्ये बदलानंतर होणार असल्याची माहितीही देण्यात आली.- निवडणुकीतील आरक्षणासाठी कायद्याची लढाईराज्यात महाराष्ट्र जिल्हा परिषद, पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील कलम १२ (२) सी मध्ये नमूद तरतुदीची अंमलबजावणी केली जाते. या तरतुदीनुसार जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत ठरवलेले आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक होते. ही तरतूद राज्यघटनेतील अनुच्छेद १४, २४३-डी, व २४३-टी मधील तरतुदींशी विसंगत असल्याचे याचिकाकर्ते गवळी यांचे म्हणणे आहे.- राज्य शासनाच्या डुलक्या२०१६ मध्ये उच्च न्यायालयात दाखल एका याचिकेच्या सुनावणीत राज्य सरकारने जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियमातील आरक्षणविषयक तरतुदीमध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठवला. तो निर्णयाधिन असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर त्या प्रस्तावावर शासनाचा कोणताच निर्णय झालेला नाही. दोन वर्षांपासून शासनाने दुरुस्तीबाबतची प्रक्रिया रखडत ठेवली. या संवेदनशील मुद्यांवरही शासनाच्या डुलक्या घेणे सुरू आहे. औरंगाबाद खंडपीठापुढे असलेल्या याचिकांमध्ये अकोला-वाशिम जिल्हा परिषदेचा समावेश नाही. या जिल्हा परिषदांना नागपूर खंडपीठाचा यथास्थिती आदेश लागू आहे. निवडणूक आयोगाकडून माहिती घेतली. कायद्यातील दुरुस्तीनंतर प्रक्रिया सुरू होऊ शकते.- विकास किसनराव गवळी, सदस्य, वाशिम, जि.प.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदElectionनिवडणूक