शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

जिल्हा परिषद अर्थसंकल्प मंजुरीचे अधिकार ‘सीईओं’ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 14:45 IST

शासनाने अंदाजपत्रक मंजुरीची कार्यवाही ठरवून दिली आहे.

अकोला: पुढील वर्षभराच्या विकास कामांचे नियोजन व खर्चाच्या तरतुदीसाठी जिल्हा परिषदांचा अर्थसंकल्प मंजूर करण्याच्या सभा कोरोनाच्या सावटाखाली रद्द कराव्या लागल्या. त्याचवेळी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाबाबत काय करावे, याचे मार्गदर्शन शासनाकडून मागविण्यात आले. त्यानुसार अर्थसंकल्पाला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंजुरी द्यावी, कोरोना नियंत्रणात आल्यानंतर सर्वसाधारण सभेत अहवाल सादर करावा, असे निर्देश ग्रामविकास विभागाने २६ मार्च रोजी राज्यातील सर्वच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थांचा अर्थसंकल्प मंजुरीसाठी दरवर्षी मार्चच्या दुसºया आठवड्यानंतर सभा नियोजित केल्या जातात. राज्यात या काळात कोरोना व्हायरसची दहशत आहे. तसेच सर्वच जिल्हा दंडाधिकाºयांनी आपत्ती व साथरोग प्रतिबंधक कायदा, जमावबंदीही लागू केली आहे. या परिस्थितीत महापालिका, जिल्हा परिषदा, नगर परिषदांच्या अर्थसंकल्पाच्या सभा घेण्याचे आव्हान निर्माण झाले. कोणत्याही परिस्थितीत अर्थसंकल्प मंजूर करावाच लागेल, यासाठी या संस्थांनी अर्थसंकल्पीय सभाही जवळपास २० मार्चनंतरच बोलाविण्यात आल्या. त्याचवेळी जिल्हा दंडाधिकाºयांच्या जमावबंदी आदेशामुळे सभा कशा घ्याव्या, हा प्रश्नही निर्माण झाला. या समस्येवर उपाय म्हणून जालना जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प शासनाकडेच मंजुरीसाठी पाठविण्यात आला. नांदेड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प एका तासाच्या सभेत मंजूर करण्यात आला. या परिस्थितीत अकोला जिल्हा परिषदेने जिल्हा दंडाधिकाºयांचे मार्गदर्शन मागविले. त्यांनीही साथरोग प्रतिबंधक कायदा, जमावबंदीचे उल्लंघन न करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, राज्यातील इतर जिल्हा परिषदांसह अकोल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनीही शासनाला २२ मार्च रोजी मार्गदर्शन मागविले. त्यावर शासनाने अंदाजपत्रक मंजुरीची कार्यवाही ठरवून दिली आहे.ग्रामविकास विभागाच्या पत्रानुसार जिल्हा परिषदेचे २०१९-२० चे अंतिम सुधारित अंदाजपत्रक व २०२०-२१ चे मूळ अंदाजपत्रक मंजूर न झाल्यास त्याचा विपरीत परिणाम कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना व इतर निकडीच्या बाबींवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या अर्थसंकल्पाला मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी मंजुरी द्यावी, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणे तसेच जमावबंदी आदेश मागे घेतल्यानंतर होणाºया जिल्हा परिषदेच्या सभेत अहवाल सादर करावा, असेही पत्रात बजावण्यात आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद