वाशिम : वाशिम ते अकोला या बसमध्ये चढत असताना १८ वर्षीय युवक यशवंत इंगोले (रा. पाटणी चौक, वाशिम) याचा तोल गेल्याने तो एसटीच्या चाकाखाली आला. त्यात त्याचा जाग्यावरच मृत्यू झाला. ही घटना सोमवारला सकाळी ६:३0 वाजताचे सुमारास वाशिम बस स्थानकावर घडली. येथील पाटणी चौक परिसरात वास्तव्यास असलेला यशवंत इंगोले हा सकाळी अकोला येथे जाण्यासाठी बस स्थानकावर गेला. यावेळी बस स्थानकावर उभी असलेली वाशिम ते अकोला ( बस क्र. एम.एच. ४0 वाय ५४४८ ) या बस मध्ये चढत असताना इंगोले याचा तोल गेल्याने तो बसच्या चाकाखाली आला. यामध्ये त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
अपघातात युवकाचा मृत्यू
By admin | Updated: July 5, 2016 00:56 IST