शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील तरुणांनी अमरावतीत केले तरुणीचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 15:10 IST

अकोला : प्रेम प्रकरणाला कुटुंबीयांचा विरोध असल्यामुळे प्रेयसीचे अपहरण करणाऱ्या दोन युवकांना अमरावती पोलिसांनी एका चारचाकी वाहनाचा फिल्मी स्टाइल पाठलाग करून पकडले व अपहृत युवतीला सोडविले.

ठळक मुद्देएका तरुणीला वाहनात कोंबून पळवून नेण्यात येत असल्याची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अपहरणात मदत करणाºया एका मुलीला प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पकडून ठेवले होते. युवतीला अकोल्याला पळवून नेण्याचा त्यांचा डाव होता. मात्र, अवघ्या दोन तासांत अपहृत तरुणीला मुक्त केले.

अकोला : प्रेम प्रकरणाला कुटुंबीयांचा विरोध असल्यामुळे प्रेयसीचे अपहरण करणाऱ्या दोन युवकांना अमरावती पोलिसांनी एका चारचाकी वाहनाचा फिल्मी स्टाइल पाठलाग करून पकडले व अपहृत युवतीला सोडविले. ही घटना शुक्रवारी अमरावती शहरातील गाडगेनगर हद्दीत दुपारी घडली.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावतीच्या नवसारी पॉवर हाऊससमोरून एका तरुणीला वाहनात कोंबून पळवून नेण्यात येत असल्याची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अपहरणात मदत करणाºया एका मुलीला प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पकडून ठेवले होते. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता या प्रकरणाचा उलगडा झाला. यादरम्यान अपहरणकर्त्या तरुणाचे मोबाइल लोकेशनसुद्धा ट्रेस केले. पोलिसांनी तात्काळ चारचाकी वाहनाचा शोध घेण्यास सुरुवात केली. ज्या दिशेला अपहरणकर्ते गेले होते, त्या दिशेकडे तपास सुरू केला असता, सदर वाहन दृष्टीस पडले. या वाहनाचा पाठलाग करून येसुर्णा ते असदपूर मार्गावर वाहन ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात सदर युवतीचा प्रियकर गोपाल ऊर्फ महेंद्र रमेश गाडे (२५, रा. शिवर, जि. अकोला) व याप्रकरणात मदत करणारा मित्र शुभम नंदकिशोर झापर्डे (१९, रा. अकोला) यांना पोलिसांनी अटक केली तसेच चारचाकी वाहनासह एक दुचाकी जप्त केली. युवतीला अकोल्याला पळवून नेण्याचा त्यांचा डाव होता. मात्र, अवघ्या दोन तासांत अपहृत तरुणीला मुक्त केले. पोलिसांनी अपहृताच्या पित्याच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला.

प्रेम प्रकरणाला कुटुंबीयांचा विरोधमुलगी व तिचे अपहरण करणारा गोपाल गाडे हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहे. अनेक वर्षांपासून दोघांचे प्रेम आहे. गोपाल अनेकदा प्रेयसीला घेऊन अकोला येथे गेला. दोघांनीही मंदिरात लग्न केल्याची माहिती आहे. मात्र, या प्रेम प्रकरणाला मुलीचे कुटुंबीय विरोध करीत होते. त्यामुळे गोपालने प्रेयसीच्या अपहरणाची योजना आखली. ही बाब पोलीस चौकशीत पुढे आली आहे.

तरुणांविरुद्ध गुन्हापीडिताच्या वडिलांनी गाडगेनगर पोलिसांत सायंकाळी नोंदविलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गोपाल रमेश गाडे (२५) व शुभम नंदकिशोर झापर्डे (२१, रा. शिवर, अकोला) विरुद्ध भादंविच्या कलम ३६३, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.

टॅग्स :AkolaअकोलाAmravatiअमरावतीKidnappingअपहरण