शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादातून तरुणाची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 21:33 IST

युवकाची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली आहे.

दहीहांडा (अकोला) : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी ३० वर्षीय युवकाची निर्घुण हत्या केल्याची घटना ४ मे रोजी सकाळी वरुर जउळका येथे घडली. नीलेश काशिनाथ दळणकार असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी दहीहांडा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. वरु र येथील नीलेश दळणकार व सागर ऊर्फ मुकेश विठ्ठल बारबदे यांच्यामध्ये ३ मे रोजी क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. या वादाचा वचपा काढण्यासाठी सागर ऊर्फ मुकेश बारबदे याने नीलेश दळणकार यांच्या घरामध्ये ४ मे रोजी सकाळी ५ वाजता आई आणि मावशी यांच्या सहकार्याने प्रवेश केला, तसेच नीलेश यांच्यावर कुºहाडीने हल्ला केला. यामध्ये नीलेश दळणकार हे गंभीर जखमी झाले. हा प्रकार लक्षात येताच दळणकार यांना तातडीने अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दळणकार यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दहीहांडा पोलिसांनी आरोपी सागर ऊर्फ मुकेश बारबदे तसेच त्याची आई व मावशी यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०७, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. जखमी युवकाचा मृत्यू झाल्याने यामध्ये भादंवि कलम ३०२ ची वाढ करण्यात येणार आहे. दहीहांडा पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून, पुढील तपास ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय भिलावेकर, पीएसआय गोरे, श्याम बुंदेले, सुभाष वाघ आदी करीत आहेत. मृत नीलेश काशिनाथ दळणकार हा महावितरण कंपनीच्या चोहोट्टाबाजार येथे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होता. (वार्ताहर) 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीMurderखून