शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

जलालाबाद येथे युवकाची हत्या

By admin | Updated: March 26, 2016 02:30 IST

धूलिवंदनास गालबोट; बाश्रीटाकळी तालुक्यातील घटना.

बाश्रीटाकळी/सायखेड (जि. अकोला): बाश्रीटाकळी हद्दीत येत असलेल्या जलालाबाद (गोटखेड) येथे धूलिवंदनास गालबोट लागले. दारू पाजण्यास नकार दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोघा बापलेकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गावातीलच एका गुराख्यास ठार केल्याची घटना गुरुवार, २४ मार्च रोजी घडली. बाश्रीटाकळी पोलिसांनी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.बाश्रीटाकळी तालुक्यातील जलालाबाद (गोटखेड) येथील संतोष रामभाऊ वाघमारे (३५) यांचा गुरुवारी रंगपंचमीच्या दिवशी आरोपी त्र्यंबक विष्णू पवार व चंद्रकांत त्र्यंबक पवार यांच्याशी वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. गावापासून १00 मीटर अंतरावर बापलेकांनी संतोष वाघमारेला लाथाबुक्क्यांनी मारून जखमी केले. जखमी अवस्थेत संतोष वाघमारे यांना आधी कापशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यानंतर अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बाश्रीटाकळीचे ठाणेदार राजेंद्र जाधव, धाबा पोलीस चौकीचे राजाभाऊ बचे, रामेकर, चव्हाण, भटकर, ठाकूर आदी पोलीस कर्मचार्‍यांनी शोध मोहीम राबवून सायंकाळी त्र्यंबक पवार (६0) व त्याचा मुलगा चंद्रकांत पवार या दोघांना अटक केली.दरम्यान, शुक्रवार, २५ मार्च रोजी मूर्तिजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदकुमार काळे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. विष्णू मोतीराम वाघमारे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३0२ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.