अकोला : शहरातील गंगानगरातील ३१ वर्षीय युवक रेल्वे स्टेशन परिसरातून बेपत्ता झाल्याची घटना १३ मे रोजी घडली. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली. बायपासवरील गीतानगरात राहणारे रोशन राठी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १३ मे रोजी सायंकाळी ७.३0 वाजताच्या सुमारास पवन हरिकिसन अटल (३१) हा रेल्वे स्टेशनवर गेला होता. त्यानंतर तो परतला नाही. त्याचा नातेवाईक व परिसरात शोध घेतला असता, आढळून आला नाही. बुधवारी त्याच्या कुटुंबीयांनी रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. बेपत्ता झालेल्या युवकाची उंची ५ फूट ३ इंच आहे. अंगामध्ये निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, गुलाबी रंगाचे शर्ट आहे. त्याच्या हातामध्ये मनगटी घड्याळ, काळ्यारंगाची बॅग, त्यामध्ये लॅपटॉप आदी साहित्य आहे. अशा वर्णनाचा युवक आढळून आल्यास नागरिकांनी रामदासपेठ पोलिस ठाण्यात संपर्क साधावा.
रेल्वे स्टेशन परिसरातून युवक बेपत्ता
By admin | Updated: May 14, 2014 20:48 IST