अकोला : समंदर पे जो छा जाता है उसे आंधी कहते हैआंधी पे जो छा जाता है उसे तुफान करते हैऔर तुफान पे जो छा जाता है उसे युवा कहते है हे वाक्य कुलगुरू खेडकर यांच्या तोंडातून बाहेर पडताच ऊर्जाशक्तीचा संचार असलेल्या तरुणांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांना दाद देत, युवाशक्तीचे दर्शन घडविले. निमित्त होते शिवाजी महाविद्यालयातील युवा महोत्सवाच्या उद्घाटनाचे. तरुणांमध्ये प्रचंड शक्ती असते. या शक्तीचा सदु पयोग होणे गरजेचे आहे. त्यामुळे तरुणांमधील शक्तीला योग्य दिशा देण्यासाठीच युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांनी केले.येथील शिवाजी महाविद्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ युवा महोत्सव २0१४ चे आयोजन १८ ते २१ सप्टेंबरदरम्यान करण्यात आले आहे. युवा महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी स्व. डॅडी देशमुख खुला रंगमंचावर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड. अरुण शेळके यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मोहन खेडकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून महापौर उज्ज्वला देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य अँड. गजानन पुंडकर, बी.जी.ई. सोसायटीचे अध्यक्ष राजकुमार हेडा, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांची उपस्थिती होती.यावेळी डॉ. खेडकर म्हणाले की, २0२0 साली भारत हा तरुणांचा देश असेल, संपूर्ण देशाचे भविष्य तरुणांच्या हातात असेल. तरुणच या देशाला पुढे नेऊ शकतात. त्यांनी आपल्यामधील गुण बघून त्यांना वाव द्यायला हवा. आपले नाव, गाव, जात, धर्म बघितल्या जात नाही तर केवळ गुण बघितल्या जातात. त्यामुळे तरुणांनी कलागुणांवर भर द्यायला हवा असे सांगत.. ह्यमंजीले वही हासील करते है जिनके हौसले बुलंद होते है. पंख से कुछ नही होता, जान तो उडानों मे होती है, असे म्हणत त्यांनी तरुणांमध्ये उत्साह भरला.
तरुणांमधील शक्तीला योग्य दिशा देण्यासाठीच युवा महोत्सव
By admin | Updated: September 19, 2014 02:20 IST