शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

युवक काँग्रेसची ‘हायटेक’ निवडणूक; अ‍ॅपद्वारे पार पडणार मतदान प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 14:16 IST

राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच युवक काँग्रेसने कामाला जोरदार सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देराज्यभरात ९, १० व ११ सप्टेंबर रोजी टॅबमधील एका अ‍ॅपद्वारे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.गत सहा महिन्यांपासूनच युवक काँग्रेसची सदस्य नोंदणी केली आहे. विविध पदांसाठी हे सदस्य ९, १० व ११ सप्टेंबर रोजी मतदान करणार आहेत.

- सचिन राऊतअकोला : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच युवक काँग्रेसने कामाला जोरदार सुरुवात केली आहे. राज्यभरातील युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी एका ‘हायटेक’ निवडणूक प्रक्रियेचा उपयोग करून युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, प्रदेश महासचिव, जिल्हाध्यक्ष, जिल्हा महासचिव व विधानसभा अध्यक्ष पदासाठी राज्यभरात ९, १० व ११ सप्टेंबर रोजी टॅबमधील एका अ‍ॅपद्वारे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.राज्यात जिल्हा-परिषद, पंचायत समिती व त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी युवक काँग्रेसने पूर्वतयारी सुरू केली असून, गत सहा महिन्यांपासूनच युवक काँग्रेसची सदस्य नोंदणी केली आहे. राज्यभर युवक काँग्रेस सदस्यांची नोंदणी केल्यानंतर आता विविध पदांसाठी हे सदस्य ९, १० व ११ सप्टेंबर रोजी मतदान करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष पदासाठी आ. अमित झनक, सत्यजित तांबे व कुणाल राऊत रिंगणात आहेत, तर प्रदेश महासचिव पदासाठी सागर देवेंद्र कावरे, अभिषेक भरगड, सागर देशमुख व श्रेयश इंगोले उभे आहेत. यासोबतच जिल्हाध्यक्ष पदासाठी महेश गणगणे, निनाद मानकर, तर शहराध्यक्ष पदासाठी अंशुमन देशमुख, आकाश शिरसाट, सुमती गवई उभे आहेत. जिल्हा महासचिव पदासाठी अभिलाष तायडे, फारुख पटेल यांच्यासह पाच जण रिंगणात आहेत. अकोल्यातील काँग्रेसच्या दुसºया फळीतील नेते या निवडणुकीनिमित्त एकत्र आले आहेत.-----------------------------मतदानासाठी एक मिनीट नऊ सेकंद वेळयुवक काँग्रेस सदस्यांना मतदान करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा स्तरावर एक टॅब ठेवण्यात येणार आहे. या टॅबमधील एका अ‍ॅपद्वारे प्रदेशाध्यक्ष, प्रदेश महासचिव, जिल्हाध्यक्ष, जिल्हा महासचिव व विधानसभा अध्यक्ष या पाच उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे. यासाठी सदर ‘अ‍ॅप’द्वारे पाच उमेदवारांना मतदान करण्यासाठी एक मिनीट नऊ सेकंद वेळ मिळणार आहे. या पाच उमेदवारांचे नाव व चिन्ह दिलेल्या ठिकाणावर क्लिक करून मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.प्रत्येक जिल्ह्यात २२ पदाधिकाºयांची टीममहाराष्ट्रात एकाच वेळी म्हणजेच ९, १० व ११ सप्टेंबर रोजी ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी उत्तरांचल, उत्तर प्रदेश, केरळ, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा येथून काँग्रेसचे पदाधिकारी राज्यात दाखल होणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात २२ तज्ज्ञ पदाधिकाºयांची टीम उपस्थित राहणार आहे. ही टीम तीन दिवस निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जिल्हा स्तरावर तळ ठोकून राहणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक