लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : तालुक्यातील माळराजुरा येथील २३ वर्षीय युवकाने बोहल्यावर चढण्यापूर्वीच आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २६ मे रोजी दुपारी उघडकीस आली. ज्ञानेश्वर वामन राठोड असे मृतक युवकाचे नाव आहे.माळराजुरा येथील ज्ञानेश्वर राठोड या युवकाचा लोहगड येथील एका मुलीबरोबर २३ मे रोजी विवाह ठरला होता. विवाहाच्या निमंत्रण पत्रिकाही नातेवाइकांना वितरित करण्यात आल्या होत्या. अशात वर युवक ज्ञानेश्वर हा १८ मेपासून घरून निघून गेला होता. त्याच्या नातेवाइकांनी पातूर पोलिसांत तो बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. १९ मे रोजी पातुरातील ढोणे नगराच्या मागील भागात काळमाथा येथील टेकडीजवळ त्याचा कुजलेला मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
बोहल्यावर चढण्यापूर्वीच युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 13:38 IST
पातूर : तालुक्यातील माळराजुरा येथील २३ वर्षीय युवकाने बोहल्यावर चढण्यापूर्वीच आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २६ मे रोजी दुपारी उघडकीस आली.
बोहल्यावर चढण्यापूर्वीच युवकाची आत्महत्या
ठळक मुद्देज्ञानेश्वर वामन राठोड असे मृतक युवकाचे नाव आहे.ज्ञानेश्वर राठोड या युवकाचा लोहगड येथील एका मुलीबरोबर २३ मे रोजी विवाह ठरला होता.पातुरातील ढोणे नगराच्या मागील भागात काळमाथा येथील टेकडीजवळ त्याचा कुजलेला मृतदेह आढळून आला.