शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

तुरीची खरेदी रखडली; व्यापाऱ्यांचा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2017 02:11 IST

अकोला : नाफेडची तूर खरेदी ३१ मेपासून बंद झाली आहे; मात्र अजूनही राज्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात तुरीचा साठा पडून आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नाफेडची तूर खरेदी ३१ मेपासून बंद झाली आहे; मात्र अजूनही राज्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात तुरीचा साठा पडून आहे. नाफेडने आता खरेदी नाकारल्याने शेतकऱ्यांकडे रखडलेल्या तुरीवर आता व्यापाऱ्यांचा डोळा लागला आहे. शेतकऱ्यांकडील तूर तीन हजार ते सत्ताविसशे रुपयांनी मागण्यास सुरुवात झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर खरेदीसाठी ताटकळत बसण्यापेक्षा अनेक शेतकऱ्यांनी साडेतीन हजार रुपयांच्या दराने व्यापाऱ्यांना विकली. आता मात्र नाफेडने खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना तूर विकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांनी पडल्या भावात तूर मागण्यास सुरुवात केली आहे.तूर खरेदीबाबतचे धोरण शासनाचे स्पष्ट नसल्याने यंदा तुरीचे भरपूर पीक असूनही भाव नाही. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांकडून नाफेडची खरेदी होत असतानाच व्यापाऱ्यांनी साडेतीन हजार रुपये क्विंटलच्या भावाने तुरीची खरेदी सुरू केली. आता तर शेतकरी स्वत:हून व्यापाऱ्यांकडे ओढल्या जाणार असल्याने हे भाव तीन हजार ते सत्ताविसशे रुपयांपर्यत पोहोचले आहेत. अकोल्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास १३० डाळ मिल आहेत. यापैकी बहुतांश डाळ मिल तुरीच्या आहेत, त्यामुळे अकोल्यातच मोठ्या प्रमाणात तुरीची आवश्यकता आहे. काही व्यापाऱ्यांकडे मागील तूर शिल्लक आहे; पण आता कमी भावात तूर मिळत असल्याने तुरीची साठेबाजी होण्याची शक्यता आहे. शासनाच्या धोरणाकडे व्यापाऱ्यांचे विशेष लक्ष आहे. शासनाने तुरीच्या निर्यातीवर बंदी घालून, डाळींची मोठ्या प्रमाणात आयात केली. दरम्यान, मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन आले. शासनाचे पुढचे धोरण काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, बिहार आणि कर्नाटक या पट्ट्यातही तुरीचे उत्पादन वाढल्याने हा पेच निर्माण झाला आहे.