शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या युवकास ट्रकने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 19:03 IST

या अपघातात युवकाचा जागेवरच मृत्यू झाला. प्रभाकर नामदेव ढेरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

अकोला - डाबकी रोडवर नाक्याजवळ रस्त्याच्या कडेला तीनचाकी गाडी थांबवून उभ्या असलेल्या युवकास भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या अपघातात युवकाचा जागेवरच मृत्यू झाला. प्रभाकर नामदेव ढेरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर आरोपी महेंद्र उमाळे असे ट्रकचालकाचे नाव आहे.डाबकी रोड जकात नाक्यासमोरील रस्त्याच्या वळणावर प्रभाकर नामदेव ढेरे हे तीनचाकी हात गाडी घेवून उभे होते. या रस्त्याचे काम सुरू असल्याने याठिकाणी ट्रक रेती, गिट्टी घेवून ये-जा करीत आहे. गिट्टी टाकून ट्रक क्रमांक एम.एच. ३० एव्ही ८०५ हा मुख्य रस्त्यावर येत असताना ट्रकने वळण घेतले. प्रभाकर ढेरे यांच्या जवळून ट्रक जात असताना ट्रकची जबर धडक त्यांना लागल्याने त्यांच्या जागेवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्रक चालक ट्रक सोडून डाबकी पोलिस ठाण्यात गेला. हा ट्रक रस्ता बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराचा असल्याची माहिती आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून गर्दी कमी केली. तसेच मृतक ढेरे यांचा मृतदेह एका अ‍ॅपेमध्ये सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आला. राहुल प्रभाकर ढेरे यांच्या तक्रारीवरुन डाबकी रोड पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम २७९, ३०४ अ, सहकलम १८४ मोटार अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात