शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पिवळा पळस फुलला!

By admin | Updated: March 13, 2016 02:01 IST

खामगाव तालुक्यात आढळला दुर्मिळ पिवळा पळस; अल्बिनिझमचा प्रकार असल्याची तज्ज्ञांची माहिती.

अनिल गवई/खामगाव होळी जवळ आली की हमखास आठवण होते ती पळस फुलांची. भर उन्हात सगळी सृष्टी ओसाड पडू लागली असताना आपण रस्त्याने जाताना दूरवर नजर टाकली तर आपल्याला एक झाड फुलले दिसते. केशरी रंगाची भरगच्च फुले लागलेली ही झाडे असतात पळसाची. केसरी पळस सगळ्यांच्याच परिचयाचा आहे; मात्र खामगाव तालुक्यातील गणेशपूर येथे दुर्मीळ असा पिवळा पळस आढळून आला आहे. खामगावपासून जवळच असलेल्या गणेशपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामागे कोकरे यांच्या शेतात पिवळ्या रंगाची फुले लागलेले पळसाचे झाड आढळले. खामगावमधील पर्यावरण मित्र संजय गुरव यांना हे पळसाचे झाड दिसले. त्यांनी याबाबतची माहिती सामाजिक वनीकरण विभागाला कळविली आहे. पिवळा पळस हा अत्यंत दुर्मीळ समजला जातो. औषधीसाठी या फुलांचा उपयोग केला जातो. पिवळ्या पळसाबद्दल अंधश्रद्धादेखील आहे. गुप्तधन शोधण्यासाठी या फुलांचा उपयोग केला जातो. त्यामुळेच जादूटोणा करणार्‍यांना नेहमीच या झाडाची ओढ असते. ही जरी अंधश्रद्धा असली तरी या झाडाचे आकर्षण सगळ्यांनाच आहे. पिवळ्या पळसाबद्दल वनस्पती शास्त्रज्ञांचे असे मत आहे की हा सगळा अल्बिनिझमचा प्रकार आहे. यामध्ये वनस्पतीतील रंगद्रव्यात बदल होतो. ऐरवी केशरी-भगव्या रंगाचे आढळणारे पळस पिवळ्या रंगाचे आढळणे हा अलगिलिझमचाच प्रकार आहे. अतिशय दुर्मीळ असणार्‍या या पिवळ्या पळसाचे संवर्धन व संरक्षण होणे आवश्यक आहे. पिवळ्या पळसाच्या वृक्षांचे रोपण व्हावे यासाठी सहा वर्षांपूर्वी याच्या बिया रोपण करून त्या उगविण्याचा प्रयत्न झाला; परंतु बिया उगविल्या नाहीत, असे गुरव यांनी सांगितले.