शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

यंदा कावड, पालखी सोहळ्याचा अमृत महोत्सव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 16:13 IST

श्री राजराजेश्वर शिवभक्त मंडळातर्फे यंदा कावड, पालखी महोत्सवाचा अमृत सोहळा साजरा करणार आहेत.

अकोला : श्री राजराजेश्वर शिवभक्त मंडळातर्फे यंदा कावड, पालखी महोत्सवाचा अमृत सोहळा साजरा करणार आहेत. त्यानुषंगाने श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी म्हणजेच २६ आॅगस्ट रोजी मंडळातर्फे विशेष तयारी करण्यात आली आहे. यंदा श्री राजराजेश्वराच्या मानाच्या पालखीवर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार असून, विविध झाकी महोत्सवाचे विशेष आकर्षण राहणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावजी यांनी सांगितले.कावड, पालखी महोत्सवाला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होत असून, मंडळातर्फे हे वर्ष अमृत महोत्सव म्हणून साजरे करण्यात येत आहे. यासंदर्भात शुक्रवार, २३ आॅगस्ट रोजी श्री राजराजेश्वर मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या अमृत महोत्सवात शिवभक्तांना नावीन्यपूर्ण आकर्षक झाकीचे दर्शन होणार आहेत. या झाकीच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश दिले जाणार आहेत. रविवारी रात्री गांधीग्राम येथून श्री राजराजेश्वराची पालखी निघाल्यावर रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने फटाक्यांची आतषबाजी केली जाणार आहे. रात्रभराच्या प्रवासानंतर पालखीचे शहरात आगमन झाल्यावर सिटी कोतवाली चौकात पालखीचे जल्लोषात स्वागत केले जाईल. या ठिकाणी फेटा घालून महिला पारंपरिक वेशात पहिल्यांदाच श्री राजराजेश्वराची पालखी घेणार आहेत. हा ऐतिहासिक क्षण ठरणार असून, जयहिंद चौक ते श्री राजराजेश्वर मंदिरापर्यंत पालखीवर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी केली जाईल. तसेच अमरावती येथूनही पालखी येणार असून, पालखीला १३७ क्रमांक दिल्याची माहिती यावेळी चंद्रकांत सावजी यांनी दिली. या सोहळ्यात सर्वच जाती-धर्माच्या समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष चंद्रशेखर उखर्डे, राजू बुंदेले अ‍ॅड. पप्पू मोरवाल व नारायणराव गाडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.महोत्सवाचे विशेष आकर्षण

  • संत गजानन महाराज, शेगाव संस्थानची दिंडी
  • दिंडीत १०० वारकऱ्यांचा असणार सहभाग
  • शिव-पार्वती, श्रीगणेश व कार्तिकेय यांची झाकी
  • ढोल पथक व पारंपरिक दिंडी झांज
  • १४० पेक्षा जास्त पालखी व शंभरपेक्षा जास्त कावड
  • सोहळ्याच्या पहिल्या पिढीतील सदस्यांचा होणार गौरव.

 

टॅग्स :Akolaअकोला