शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

यावर्षी ‘सेट’ नाहीच!

By admin | Updated: November 14, 2014 23:13 IST

युजीसीच्या जाचक रीअँक्रिडिटेशनचा फटका, पुढील वर्षी होणार परीक्षा.

अकोला : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार राज्यस्तरावर घेण्यात येणारी स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट (सेट) यावर्षी होणार नसल्याचे आता निश्‍चित झाले आहे. पुढील परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना फेब्रुवारी, मार्च २0१५ पर्यंत वाट पहावी लागणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाच्यावतीने पदव्युत्तर पदवीत ५५ टक्के गुण म्हणजेच ह्यबी प्लसह्ण प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांची सेट परीक्षा घेण्यात येते. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमधील विद्यार्थ्यांची वर्षातून दोन वेळा ही परीक्षा घेतली जाते; मात्र गत काही वर्षांंपासून त्यात खंड पडला आहे. वर्षातून दोन वेळा होणारी ही परीक्षा आता वर्षातून एकदाच घेतली जात आहे. त्यामुळे परीक्षेची मोठय़ा आतुरतेने वाट पाहणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. विद्यापीठाला प्रत्येक परीक्षा घेण्यापूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या रीअँक्रिडिटेशन समितीकडून परवानगी घ्यावी लागते. परवानगी घेण्याची ही प्रक्रिया किचकट आणि संथगतीने चालत असल्याने विद्यापीठाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळेच विद्यापीठांनी वर्षातून एकदाच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने २0११ साली दोन परीक्षा घेतल्या होत्या. ७ ऑगस्ट आणि २७ नोव्हेंबर अशा दोन तारखांना या परीक्षा झाल्या. २0१२ साली एकही परीक्षा होऊ शकली नाही. गतवर्षी १७ फेब्रुवारी २0१३ रोजी पूणे विद्या पीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाकडून परवानगी घेऊन सेट घेतली. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास विलंब झाला. यावर्षी २0१४ मध्ये परीक्षा घेण्याचे प्रयत्न पूणे विद्यापीठाकडून सुरू होते. सुरुवातीला उन्हाळ्यात ही परीक्षा घेतली जाईल, असे संकेत मिळाले होते; परंतु लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. नंतर दिवाळीच्या आधी ही परीक्षा होईल, अशी अपेक्षा होती; मात्र विधानसभा निवडणुका लागल्यामुळे पुन्हा परीक्षा स्थगित झाली. निवडणुका आणि दिवाळीची धामधूम आटोपल्यानंतर डिसेंबरमध्ये परीक्षा होईल, अशी आशा होती; मात्र ही आशा आता मावळली आहे. सेट आता २0१५ साली फेब्रुवारी/ मार्चमध्ये होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सेट देऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांंना आता आणखी दोन-तीन महिने वाट पहावी लागणार आहे.