शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

वर्ष उलटले, पण दीड लाखांवर शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेतच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 15:00 IST

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार २ लाख ७९ हजार शेतकऱ्यांपैकी २५ जूनपर्यंत केवळ १ लाख १६ हजार ४०२ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.

ठळक मुद्देसन २००९ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली आहे. १ लाख ३८ हजार शेतकऱ्यांपैकी २५ जूनपर्यंत १ लाख १६ हजार ४०२ शेतकºयांना ४८९ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. जिल्ह्यातील १ लाख ६२ हजार ५९८ शेतकºयांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.

- संतोष येलकर

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार २ लाख ७९ हजार शेतकऱ्यांपैकी २५ जूनपर्यंत केवळ १ लाख १६ हजार ४०२ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे शासनाच्या कर्जमाफीच्या घोषणेला वर्षभराचा कालावधी उलटून गेला असला तरी, जिल्ह्यातील १ लाख ६२ हजार ५९८ शेतकरी अद्यापही कर्जमाफी लाभाच्या प्रतीक्षेत असल्याचे वास्तव आहे. त्यानुषंगाने कर्जमाफीपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गत २८ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार सन २००९ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली आहे. त्यानुषंगाने थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी गत सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकºयांकडून आॅनलाइन अर्ज भरून घेण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यातील एकूण २ लाख ७९ हजार थकबाकीदार शेतकऱ्यां पैकी १ लाख ३८ हजार ७३२ शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज केले होते. आॅनलाइन अर्ज केलेल्या आणि कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया गत आॅक्टोबरपासून सुरू करण्यात आली. आॅनलाइन अर्ज केलेल्या १ लाख ३८ हजार शेतकऱ्यांपैकी २५ जूनपर्यंत १ लाख १६ हजार ४०२ शेतकºयांना ४८९ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून, त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकबाकीदार शेतकºयांचा समावेश आहे. शासनाच्या कर्जमाफीच्या घोषणेला वर्षपूर्ती होत असली तरी, जिल्ह्यातील १ लाख ६२ हजार ५९८ शेतकºयांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत कर्जमाफीच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत संपुष्टात!कर्जमाफीसाठी गतवर्षी आॅनलाइन अर्ज सादर करू न शकलेल्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी शासनामार्फत आॅनलाइन अर्ज सादर करण्याची २० जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज करण्याची ही मुदतही आता संपुष्टात आली आहे.कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात आॅनलाइन अर्ज सादर केलेल्या शेतकºयांपैकी २५ जूनपर्यंत १ लाख १६ हजार ४०२ शेतकºयांना ४८९ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून, थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे.- गोपाळ मावळे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था).

 

टॅग्स :Akolaअकोला