शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

निराधार कृष्णासाठी प्रतिभा झाली ‘यशोदा’; पाच वर्षांपासून उपचार घेत असलेल्या मुलास दिला आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 02:15 IST

अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ‘कृष्णा’ला आणि सर्व रुग्णालयालाच आली. गत पाच वर्षांपूर्वी झाडावरून पडल्याचे निमित्त होऊन लुळापांगळा झालेल्या वाशिम जिल्हय़ातील कृष्णा किशोर पवार याला मदतीचा हात देऊन जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा अवचार या त्याच्यासाठी ‘यशोदा’ ठरल्या.

ठळक मुद्दे सवरेपचार रुग्णालयात साजरा केला वाढदिवस

अतुल जयस्वाल । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कृष्णाला जन्म देवकीने दिला असला, तरी त्याचे पालनपोषण मात्र यशोदेने केले. त्यामुळे जन्म देणार्‍यापेक्षा पालनपोषण करणारी माता श्रेष्ठ मानली जाते. अशीच काहीशी प्रचिती अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ‘कृष्णा’ला आणि सर्व रुग्णालयालाच आली. गत पाच वर्षांपूर्वी झाडावरून पडल्याचे निमित्त होऊन लुळापांगळा झालेल्या वाशिम जिल्हय़ातील कृष्णा किशोर पवार याला मदतीचा हात देऊन जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा अवचार या त्याच्यासाठी ‘यशोदा’ ठरल्या. नववर्षाच्या पहिल्या दिवशी १७ वर्षीय कृष्णाच्या आयुष्यातील पहिला आणि सवरेपचार रुग्णालयातीलही बहुधा पहिलाच वाढदिवस साजरा करण्यात आला.वाशिम जिल्हय़ातील मालेगाव येथील कृष्णा किशोर पवार हा मुलगा वर्ष २0१३ मध्ये शेळय़ांसाठी चारा तोडताना झाडावरून पडला. या घटनेने त्याचे आयुष्यच बदलून गेले. जखमी झालेल्या कृष्णाला त्याच्या आईने अकोल्यातील सवरेपचार रुग्णालयात आणले. वडील नसल्यामुळे कृष्णा हाच तिच्यासाठी सर्व काही होता. झाडावरून पडल्यामुळे झालेल्या गंभीर जखमा भरून निघत नव्हत्या. अशातच त्याची शुश्रूषा करताना रुग्णालयातच आईचा मृत्यू झाला. तेव्हापासून कृष्णा रुग्णालयाच्या १२ क्रमांकाच्या वॉर्डात भरती आहे. एक दिवस रुग्णांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा अवचार व त्यांचे पती प्रभाकर अवचार यांना कृष्णा दिसला व त्यांनी कृष्णाला मदत करण्याचा निर्णय घेतला. कृष्णाला झालेल्या जखमा चिघळल्याने त्याच्या जवळही कोणीही फिरकायला तयार नसायचे. अशात प्रतिभा अवचार यांनी त्याच्यावर उपचार करणारे डॉ. कृष्णा केसान, डॉ. अविनाश देशमुख, डॉ. विरवाणी यांच्याशी चर्चा करून त्याला मुंबई येथील इस्पितळात नेले. तेथे उपचार केल्यानंतर कृष्णाच्या जखमा भरून निघाल्या, तरी त्याला कायमचे अपंगत्व आले. त्यामुळे त्याला पुन्हा सवरेपचार रुग्णालयात ठेवण्यात आले. तेव्हापासून प्रतिभा अवचार या नियमितपणे कृष्णाला भेटण्यासाठी येतात. कृष्णालाही त्याचा लळा लागला आहे. तो अवचार दाम्पत्यास आई-बाबा म्हणतो. वार्ड क्र. १२ हे त्याचे घरच झाले असून, या ठिकाणी कार्यरत असलेल्या परिसेविका गोदावरी कलोरे, विजया बोळे, मीना तारणेकर, सूर्यकांता अडबोल, सफाई कर्मचारी विश्रांती कांबळे, संतोष इंदूरकर हे त्याची शुश्रूषा करीत आहेत. रुग्णालयात डबे पुरविणार्‍या रुखसाना या दररोज त्याच्यासाठी विनामूल्य जेवण आणतात.

वॉर्ड बनला ‘बर्थडे हॉल’सोमवार, १ जानेवारी रोजी अवचार दाम्पत्याने कृष्णाचा वाढदिवस साजरा केला. त्याच्या आयुष्यातील हा पहिलाच वाढदिवस होता. यावेळी वॉर्ड क्र. १२ ला बर्थ डे हॉलचे रूप आले होते. कृष्णाने केक कापला व पहिला घास आपल्या ‘यशोदे’ला भरविला. यावेळी कृष्णाच्या डोळय़ात आनंदाश्रू तरळले होते. थोडा वेळ त्याच्या चेहर्‍यावरील दुख: मावळतीला जाऊन हास्याची लकेर उमटली. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, मनपा गटनेता गजानन गवई, प्रभाकर अवचार, सिद्धार्थ सिरसाट, सुरेंद्र तेलगोटे, वसंत मार्के, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप पांडव, विजय राठोड, ओम उजवणे, रुग्णालयातील कर्मचारी वृंद व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते. 

टॅग्स :Akola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयwashimवाशिम