शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

वायगाव हळदीचा वनवास संपला!

By admin | Updated: March 9, 2016 01:59 IST

भौगोलिक निर्देशन मिळाल्याने जागतिक बाजारपेठेचा मार्ग मोकळा.

राजरत्न सिरसाट/अकोलाविदर्भातील वायगावच्या हळदीला भौगोलिक निर्देशन(जीआय) मिळाल्याने वर्षानुवर्षाचा वनवास संपला असून, या हळदीला स्वतंत्र ओळख मिळाल्याने जागतिक बाजारपेठेचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये वायगाव हळद उत्पादक शेतकर्‍यांचा मोलाचा वाटा आहे.वर्धा जिल्ह्यातील 'वायगाव' या नावाने संपूर्ण विदर्भात हळद प्रसिद्ध आहे. सेलम, राजापुरी, कृष्णा, फुले स्वरू पा आदी हळदीच्या जाती प्रचलित आहेत. तथापि, वायगावची हळद सात महिन्यांत येणारी असून, या हळदीमध्ये (कुरकमिन) पिवळेपणा सहा ते सात टक्के आहे. या सुवासिक हळदीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे; परंतु या हळदीची अधिकृत नोंद कृषी विभागाच्या दफ्तरी नव्हती. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधन केल्यानंतर भारतीय कृषी संशोधन परिषदेने या हळदीला मान्यता दिली; परंतु हळद उत्पादक शेतकर्‍यांचे समाधान न झाल्याने नागपुरी संत्र्याप्रमाणे वायगावच्या हळदीला स्वतंत्र ओळख मिळावी, यासाठीचे प्रयत्न त्यांनी सुरू केले होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, चेन्नई येथील भौगोलिक निर्देशन, निबंधक कार्यालयाने या हळदीला अलीकडेच भौगोलिक निर्देशन प्रमाणपत्र दिले आहे. याकरिता या हळदीचे अनेक पुरावे शेतकर्‍यांना तज्ज्ञ शास्त्रज्ञांपुढे मांडावे लागले. या निर्देशनामुळे आता भेसळ तर करता येणार नाहीच, शिवाय इतरांना पेंटटसुद्धा घेता येणार नाही.विदर्भात हळदीचे क्षेत्र १२ हजार हेक्टरवर आहे. देशात १८५.३२ लाख हेक्टरवर हळदीचे पीक घेतले जाते. या क्षेत्रामधून जवळपास ७0१. ६६ टन उत्पादन मिळते. मसाल्याच्या पदार्थात हळदीचे प्रमाण २१.६ टक्के आहे. याशिवाय उत्तम गुणधर्म असलेल्या हळदीच्या पानापासून तेल काढले आहे. या तेलाला सर्वाधिक मागणी आहे. हळदी तेल औषधोपयोगी हळदीचे तेल हृदयाची रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी उपयोगी ठरते. रक्तशुद्धी करते, रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण, कफ कमी करते, रोगप्रतिकारक शक्ती वाढविते, सुजीवर प्रभावी आहे, खोकला-सर्दीवर जालीम उपायकारक असून, जखम दुरुस्त करण्यास ती उपयुक्त ठरते. यामुळे शरीरातील अंतर्गत जखमा द्रुतगतीने भरून निघतात. परफ्यूममध्येही तिचा वापर करता येतो.