शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

चेहरा साधर्म्यामुळे पकडला चुकीचा युवक

By admin | Updated: April 19, 2017 01:31 IST

अकोला : चिमुकलीवर बलात्कार प्रकरणात पोलिसांनी चेहरा साधर्म्यामुळे प्रवीण चव्हाण याला अटक केली होती; मात्र प्रवीण आरोपीच नसल्याचा खुलासा पोलीस अधीक्षक यांनी केला.

टिळक रोड चिमुकलीवरील बलात्कार प्रकरणअकोला : जुने शहरातील रहिवासी चिमुकलीवर बलात्कार प्रकरणात पोलिसांनी चेहरा साधर्म्यामुळे प्रवीण चव्हाण याला अटक केली होती; मात्र प्रवीण चव्हाण या प्रकरणात आरोपीच नसल्याचा खुलासा खुद्द पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकारपरिषदेत केला. शेख मुत्सेद्दीन कुरेशी अ. जाकीर कुरेशी आणि प्रवीण चव्हाण या दोघांचे चेहरे ९० टक्के सारखेच असून, त्यांचे केस आणि शरीराची ठेवणही सारखी आहे, त्यामुळे ही गफलत झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. प्रवीण चव्हाण हा या प्रकरणात आरोपी नसल्याने त्याला लवकरच आरोपमुक्त करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले; मात्र या प्रकरणामुळे चव्हाण याची बदनामी झाली. हा प्रकार चुकीतून घडल्याचे पोलीसांनी सांगितले. शेख मुत्सेद्दीन कुरेशी अ. जाकीर कुरेशी आणि प्रवीण चव्हाण या दोघांचे चेहरे सारखेच, त्यामुळे पीडित मुलीसमोर ओळखपरेड झाली असता, तिनेही प्रवीण आरोपी असल्याचे सांगितले होते आणि पोलीस त्याला पकडण्यासाठी गेले असता प्रवीण पोलिसांना पाहताच पळून गेला होता. पोलिसांनी आरोपींचे स्केच बनविल्यानंतर प्रवीण आणि शेख मुत्सेद्दीन यांचे चेहरे सारखेच दिसत होते, त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला आणि पोलिसांनी त्याला अटक केली. प्रवीण हा २२ पर्यंत पोलीस कोठडीत असून, त्यानंतरच त्याची सुटका होणार आहे आणि दोषारोपपत्र सादर करताना त्याला आरोपमुक्त करण्यात येणार असल्याचे यावेळी पोलीस अधिक्षकांनी स्पष्ट केले.तपास शहर पोलीस उपअधीक्षकांकडेदरम्यान, या बलात्कार प्रकरणाचा तपास शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा सखोल तपास आता उमेश माने पाटील करणार असून, त्यांनी मंगळवारीच या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली.अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखलशेख मुत्सेद्दीन कुरेशी अ. जाकीर कुरेशी आणि मोहसीन कुरेशी मो. अन्वर कुरेशी या दोन आरोपींविरुद्ध बलात्कार, पॉस्को आणि विविध कलमासह अ‍ॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंदा साखरे याच्याविरुद्धही या कलमात वाढ करण्यात आली.