अकोला : वर्हाडात अनेक प्रतिभावंत कलाकार, लेखक आहेत. मात्र, ते त्यांच्यातील प्रतिभा व्यक्त करीत नाहीत. त्यांनी पुस्तकांच्या विक्रीची काळजी न करता लिहिते व्हायला हवे, असा सूर ह्यसकाळचा मॉर्निंंंग वॉकह्ण या पुस्तक प्रकाशन समारंभ प्रसंगी मान्यवरांच्या भाषणातून निघाला.नीरज आवंडेकर लिखित ह्यसकाळचा मॉर्निंंंग वॉकह्ण या पुस्तकाचे प्रकाशन दुपारी ४ वाजता गोरक्षण रोडवरील अस्पायरच्या कार्यालयात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कुलकर्णी होते. प्रमुख अतिथी म्हणून श्री पाद अपराजित, गजानन जानभोर, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, सुधाकर खुमकर यांची उपस्थिती होती. यावेळी नीरज आवंडेकर यांनी लिहिलेल्या ह्यसकाळचा मॉर्निंग वॉकह्ण पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रीय स्तराचा पुरस्कार प्राप्त केल्यामुळे व्यंगचित्रकार गजानन घोंगडे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. प्रास्तविकात गजानन जानभोर म्हणाले, की नीरज यांनी जे अनुभवले ते लेखणीतून मांडले. त्यामुळेच त्यांच्या लिखाणाला वाचकांची दाद मिळत आहे. संचालन प्रा. गजानन नारे व आभार प्रदर्शन अशोक ढेरे यांनी केले.
वर्हाडातील लेखकांनो, लिहिते व्हा!
By admin | Updated: September 8, 2014 00:47 IST