शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

अठरा एड्सग्रस्त जोडप्यांचा फुलला संसार

By admin | Updated: June 12, 2014 19:03 IST

एड्स म्हणजे मृत्यूचा सापळा. या सापळ्यात अडकलेल्यांच्या जीवनात विवाह लावून जगण्याची उमेद निर्माण करण्याचे कार्य एड्सग्रस्तांनी एड्सग्रस्तांसाठी उभारलेली एनएपी संस्था करीत आहे.

अकोला : एड्स म्हणजे मृत्यूचा सापळा. या सापळ्यात अडकलेल्यांच्या जीवनात विवाह लावून जगण्याची उमेद निर्माण करण्याचे कार्य एड्सग्रस्तांनी एड्सग्रस्तांसाठी उभारलेली एनएपी संस्था करीत आहे. या संस्थेने आतापर्यंत १८ एड्सग्रस्त जोडप्यांचे विवाह लावून त्यांचे संसार सुरू करून दिले आहेत. एड्सग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांना मानसिक आधार देण्यासाठी एड्सग्रस्त असलेल्या काही तरुणांनी अकोल्यात एनएपी, नेटवर्क ऑफ अकोला बाय पीपल लिव्हिंग विथ एचआयव्ही ही संस्था २००७ साली सुरू केली. तेव्हापासून या संस्थेच्या माध्यमातून एड्सग्रस्तांच्या मदतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. यातील विशेष उपक्रम म्हणजे विवाह लावण्याचा. समाजाचा एड्सग्रस्तांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हीनत्वाचा आहे. अशा एड्सग्रस्तांशी विवाह कोण करणार? असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे एनएपी संस्थेने त्यांच्या विवाह लावून संसार सुरू करण्याचा उपक्रम सुरू केला. संस्थेकडे जिल्ह्यातील ७० टक्के एड्सग्रस्तांची माहिती आहे. त्यांनी विवाह रजिस्टर तयार केले असून, त्यामध्ये विवाहयोग्य एड्सग्रस्तांची नावे, माहिती व परिचय पत्र गोळा केले आहेत. विवाह योग्य पुरुष व महिलेचा विवाह वयाचा आधार घेऊन लावून देण्यात येतो. विवाह लावताना जात, धर्म, पंथ, श्रीमंती, गरिबी याचा भेद केल्या जात नाही. संसर्गित लोकांमध्ये पती किंवा पत्नीचा एड्सच्या दुर्धर आजाराने मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये नैराश्य, भीतीयुक्त वातावरण निर्माण होते. एकटेच आयुष्य जगावे लागले. अशा विधवा व विधुरांना मानसिक आधार देऊन स्वाभिमानी अर्थपूर्ण वैवाहिक जीवन जगण्याची प्रेरणा निर्माण करून त्यांचे विवाह संस्थेच्या माध्यमातून लावून देण्यात येतात. याकरिता संस्थेच्या अध्यक्ष शुभांगी खराटे, उपाध्यक्ष गौतम ढाले, सचिव गोपाल चव्हाण यांच्यासह सदस्य कार्यरत असतात. ** चार जोडप्यांना झाली सदृढ मुलेपती-पत्नी दोघेही एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्यावर त्यांनी शारीरिक संबंध ठेवताना व मातेने गर्भधारणेच्या वतीने योग्य औषधोपचार घेतल्यास निगेटिव्ह मुले होऊ शकतात. एनएपी संस्थेने लावलेल्या अठरा विवाहांपैकी चार जोडप्यांना चार निगेटिव्ह मुले झाली आहेत. त्यांना एड्स नसून, त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे संस्थेचे सचिव चव्हाण यांनी सांगितले.