शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

सफाई कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

By admin | Updated: June 26, 2014 02:07 IST

आंदोलनात सहभागी कर्मचार्‍यांचे वेतन कापण्याचे अकोला महापालिका प्रशासनाचे आदेश.

अकोला : महापालिका प्रशासनाने बदल्या केल्याच्या निषेधार्थ सफाई कामगारांनी बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले. सफाई कामगारांपुढे न झुकता महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. कामावर न येणार्‍या कर्मचार्‍यांचे वेतन कापण्याचे आदेश उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी दिले आहेत. शहरातील स्वच्छतेची समस्या मार्गी लागण्यासाठी महापालिका प्रशासनाने सफाई कर्मचार्‍यांच्या झोननिहाय नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला अखिल भारतीय सफाई मजदूर कॉँग्रेसने विरोध केला. पूर्वसूचना अथवा चर्चा न करताच मनपाने ७४0 सफाई कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. सफाई कर्मचारी विजयनगर, शिवाजीनगर, बापूनगर, चवरे प्लॉट, खदान या भागात राहतात. बदल्यांमुळे त्यांना संबंधित वॉर्डात जाणे व येण्यासाठी रोज ४0 रुपये खर्च येणार आहे. लवकरच शाळा सुरू होणार आहे. बदल्यांमुळे महिलांना लवकर घराबाहेर पडावे लागणार आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होईल, असाही दावा संघटनेने केला आहे. त्यामुळे या बदल्या रद्द करण्याच्या मागणीला घेऊन अखिल भारतीय सफाई मजदूर कॉँग्रेसच्यावतीने कामबंद आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी सकाळी सफाई कामगारांनी काम केलेच नाही. महापौर व उपमहापौर यांनी सफाई कामगारांना आंदोलन न करण्याची विनंती केली होती; परंतु ती धुडकावून लावत सफाई कामगार संपावर गेले. दुपारी सफाई कामगार उपायुक्त चिंचोलीकर यांच्याशी चर्चा करण्याकरिता व आपले म्हणणे मांडण्याकरिता महापालिकेत गेले; परंतु उपायुक्त न आल्याने चर्चा होऊ शकली नाही. सफाई कामगारांच्या कामबंद आंदोलनाचा परिणाम अकोला शहरातील स्वच्छतेवरदेखील दिसून आला.