शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 12:37 IST

महापारेषण कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण रखडले असून, त्यावर महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपला तोडगा सापडत नसल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अकोला : मोठा गाजावाजा करीत भाजपाने नेहरू पार्क ते संत तुकाराम चौकापर्यंत सिमेंट रस्त्याच्या कामाला दोन वर्षांपूर्वी सुरुवात केली. सद्यस्थितीत महापारेषण कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण रखडले असून, त्यावर महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपला तोडगा सापडत नसल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.नेहरू पार्क चौक ते संत तुकाराम चौकापर्यंत सिमेंट रस्त्याच्या कामाला दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. महापालिकेचे उदासीन धोरण व सत्ताधारी भाजपाच्या मतांच्या राजकारणामुळे गोरक्षण रस्त्याचे रुंदीकरण रखडल्याचे चित्र आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने महापारेषण कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रस्त्याची एक बाजू अर्धवट सोडली आहे. रस्त्याचे अर्धवट बांधकाम करून कंत्राटदाराने हात वर केले आहेत. महापारेषण कार्यालय ते छत्रपती चौकापर्यंत रस्त्यालगतच्या इमारतींचा काही भाग हटविण्याची प्रक्रिया ठप्प पडली असून, विद्युत पोलचे शिफ्टिंग रखडले आहे. इन्कम टॅक्स चौकात दोन्ही बाजूंच्या इमारतींचा काही भाग हटविताना प्रशासनाने धडक कारवाई केली होती. आता मात्र ही कारवाई थंड बस्त्यात सापडल्यामुळे सिमेंट रस्त्याचे काम रेंगाळल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाने व विद्युत विभागाने धडक कारवाई करणे अपेक्षित आहे. तसे होत नसल्यामुळे प्रशासनावर नेमक्या कोणत्या राजकीय नेत्यांचा दबाव आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.पोल शिफ्टिंग नाहीच!आज रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने महापारेषण कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत अर्धवट रस्ता तयार केला आहे. शिवाय, त्या ठिकाणी विद्युत पोलचा अडथळा कायम आहे. यासंदर्भात महापौर जितेंद्र वाघ यांनी मनपाचे विद्युत विभाग प्रमुख अमोल डोईफोडे यांना पोल शिफ्टिंग करण्याचे निर्देश दिले होते. मागील महिनाभरापासून अद्यापही रस्त्याच्या मधातील विद्युत खांब कायम आहेत, हे विशेष.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका