शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

ग्रामस्थांच्या श्रमदानाचे झाले फलित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 02:33 IST

पिंजर  : जलसंधारणाचा ध्यास घेतलेल्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमदान केले. या श्रमदानाचे फलित म्हणजे सर्वत्र ढाळीचे बांध तयार करण्यात आले.  एवढेच नव्हे, तर गावात झालेल्या कामांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत बाश्रीटाकळी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला. 

ठळक मुद्देवॉटर कप विजेतेखेर्डा परिसरात सर्वत्र झाले ढाळीचे बांधजुन्या कामाची केली दुरुस्ती 

चंद्रशेखर ठाकरे । लोकमत न्यूज नेटवर्कपिंजर  : जलसंधारणाचा ध्यास घेतलेल्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमदान केले. या श्रमदानाचे फलित म्हणजे सर्वत्र ढाळीचे बांध तयार करण्यात आले.  एवढेच नव्हे, तर गावात झालेल्या कामांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत बाश्रीटाकळी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला. 

अभिनेता आमिर खान यांच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २0१६-१७ मध्ये खेर्डा खुर्दने सहभाग नोंदवून श्रमदानची सुरुवात केली होती. ग्रामस्थांनी केलेल्या श्रमदानाचा ६ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते त्यांना १0 लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनीसुद्धा त्यामध्ये आठ लाख रुपयांची भर टाकली. त्यापाठोपाठ खेर्डा खुर्दवर निधींचा वर्षाव करीत आ. हरीश पिंपळे यांनी १0 लाख व या सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य यांनी चार लाख रुपयांचा निधी मंजूर केला. स्पर्धेमधील जलसंधारणाच्या कामामध्ये डिप सीसीटी, विहीर पुनर्भरण, नाला खोलीकरण, माती नाला बांध तसेच जलयुक्त शिवार योजनेतील अपूर्ण राहिलेले १00 बाय १00 चे शेततळे श्रमदानातून पूर्ण केले व माथा ते पायथा संपूर्ण कामे ग्रामस्थ तसेच स्वयंसेवी संस्थांनी सहभागी होऊन पूर्ण केले. खेर्डा खुर्द शिवारातील ७५२ हेक्टर जमीन क्षेत्र असून, या संपूर्ण क्षेत्रामध्ये श्रमदानातून ढाळीचे बांध खोदून पाणी थांबविण्याचा प्रयत्न झाला.

जुन्या कामाची केली दुरुस्ती जुन्या माती बंधार्‍याची दुरुस्ती करून पाणी थांबविले. शोषखड्डे, सिमेंट नाला बंधार्‍यांची दुरुस्ती करण्यात आली. संपूर्ण शेतकर्‍यांच्या शेतीची माती तपासणी झालेली असून, शेतकर्‍यांना त्याचा मोठय़ा प्रमाणात फायदा होत आहे. स्पर्धेदरम्यान १७ मे २0१७ रोजी महाश्रमदान झाले. यामध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत तसेच मिक्स अँकॅडमी अकोला येथील ५00 विद्यार्थ्यांंनी सहभाग नोंदविला होता.

१४ एप्रिल २0१७ रोजी संपूर्ण गावाने श्रमदानातून माती नाला बांध बांधून त्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देऊन जयंतीदिनी आदरांजली वाहिली. भविष्यामध्ये निर्माण होणारी पाणी समस्या लक्षात घेता, ग्रामस्थांनी महाश्रमदान करून गावाच्या प्रगतीकरिता अहारोत्र झटून विकासाचे ध्येय पूर्ण केले. यामध्ये स्वयंसेवी संस्था व शासकीय कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.- सुरेश सोनोने, ग्रामस्थ.

मी दिलेल्या हाकेला ग्रामस्थांनी ओ दिल्याने व गाव दुष्काळमुक्त करण्याच्या संकल्पनेमुळे गाव विकास कामे करीत असून, यामध्ये प्रशासक नाकारून चांगले सहकार्य लाभले.- संदीप चौधरी, सरपंच  

मी दिलेल्या हाकेला ग्रामस्थांनी ओ दिल्याने व गाव दुष्काळमुक्त करण्याच्या संकल्पनेमुळे गाव विकास कामे करीत असून, यामध्ये प्रशासक नाकारून चांगले सहकार्य लाभले.- संदीप चौधरी, सरपंच