शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतला दिलेली कामे कंत्राटदारांच्या घशात

By admin | Updated: July 7, 2017 01:30 IST

सक्षमीकरणाच्या नावाखाली ग्रामपंचायतींची कंत्राटदारांना कामे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीत भर पडावी, त्यातून गावातील कामे व्हावी, यासाठी शासनाने विकास कामे करण्यासाठी ग्रामपंचायतच्या पदरात टाकली तरी ती कामे स्वत: न करता कंत्राटदारांच्या घशात घालून पदाधिकाऱ्यांना लाभाचे वाटेकरी केले जात आहे. त्यातून शासनाचा उद्देश बाजूला पडत आहे. त्याकडे ना जिल्हा परिषदेचे लक्ष आहे ना शासनाचे, त्यामुळेच ग्रामपंचायतींऐवजी संबंधितांचे घर भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे. ग्रामपंचायत संस्थांचे बळकटीकरण करणे, तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाने २५ मार्च २०१५ रोजीच्या आदेशानुसार विकासकामे करण्यासाठी ग्रामपंचायतीला ‘एजन्सी’चा दर्जा दिला. त्यानुसार वार्षिक उत्पन्न पाहता ग्रामपंचायतींना १० ते १५ लाख रुपयांपर्यंतची कामे देण्यात येतात. त्याचवेळी शासनाने ठरवून दिलेल्या काही मुद्यांकडे दुर्लक्ष करत ग्रामपंचायतींना डोळेझाक करून कामे दिली जात आहेत. त्यामध्ये वर्षभरात ६० लाखांपेक्षाही अधिक कामे एजन्सी म्हणून ग्रामपंचायतींकडे दिली जात आहेत. ती कामे ग्रामपंचायती स्वत:कडे घेतल्यानंतर त्याचे ई-टेंडरिंग करतात. त्यामुळे ती कामे पुन्हा कंत्राटदारांच्या घशात देण्याचेच काम केले जाते. ग्रामपंचायतींनी ती कामे स्वत: केल्यास त्यांना १५ टक्के निधी नफ्याच्या रूपात शिल्लक राहतो; मात्र तसे न करता कंत्राटदाराला कामे देऊन नफ्याच्या रकमेचे वाटप करण्याचा पायंडा सर्वच ग्रामपंचायतींनी पाडला आहे. ई-टेंडरिंग करायचे तर जिल्हा परिषदेत का नाही?ग्रामपंचायतींकडे काम गेल्यानंतर तीन लाखांपेक्षा अधिक रकमेच्या कामासाठी ई-टेंडरिंग करावे लागते. त्यातून कंत्राटदाराची नियुक्ती केली जाते; मात्र तेच करायचे असेल तर जिल्हा परिषद स्तरावरच ई-टेंडरिंग करून कंत्राटदारांची नियुक्ती करण्याची मागणीही आता पुढे येत आहे. पंधरा टक्के ग्रामनिधीत जमा व्हावेकोणत्याही कामाच्या किमतीतून किमान १५ टक्के रक्कम संबंधित एजन्सी, कंत्राटदाराला मिळते. ग्रामपंचायतीकडे एजन्सी म्हणून असलेल्या कामांतून उरणारा १५ टक्के निधी कोठे जातो, याची कुणालाही माहिती नाही. ग्रामपंचायतींकडे असलेल्या कामांतून हा निधी ग्रामनिधीत जमा होण्याची गरज आहे.