शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील २८ कोटींच्या कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 13:54 IST

अकोला : दलित वस्ती विकास आराखड्यातील मंजूर कामांसाठी २८ कोटी रुपयांच्या निधी वाटपाला मंजुरी तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अकोट, अकोला तालुक्यातील याद्या वगळता इतर याद्यांना समाजकल्याण समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

ठळक मुद्देअकोला, अकोट वगळता लाभार्थी याद्या मंजूर

अकोला : दलित वस्ती विकास आराखड्यातील मंजूर कामांसाठी २८ कोटी रुपयांच्या निधी वाटपाला मंजुरी तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अकोट, अकोला तालुक्यातील याद्या वगळता इतर याद्यांना समाजकल्याण समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सभापती रेखा अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक बुधवारी पार पडली.आधीच्या नियोजनानुसार दलित वस्तीमध्ये निधी वाटपातील असमानता दूर करीत नव्याने तयार झालेल्या २८ कोटी रुपये वाटपाला या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये दलित वस्ती विकास योजनेच्या आराखड्यात मंजूर आणि आतापर्यंत त्यासाठी काहीच निधी न दिलेल्या कामांवर हा निधी देण्यात आला. समितीच्या सदस्यांनी त्याला मंजुरी दिली. सोबतच जिल्हा परिषद उपकरातून राबवल्या जाणाºया वैयक्तिक लाभाच्या योजनांतील लाभार्थींच्या अर्जांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये विद्युत पंप, होंडा पंप, टिनपत्रे, ताडपत्री, एचडीपीई पाइप, पीव्हीसी पाइप, रोटाव्हेटर, दिव्यांगासाठी पीठगिरणी, तीनचाकी सायकल, झेरॉक्स मशीन लाभार्थींचा समावेश आहे. प्राप्त अर्जांतून १५० पेक्षाही अधिक पात्र लाभार्थींची निवड यादी मंजूर करण्यात आली. बैठकीला सदस्य सरला मेश्राम, देवानंद गणोरकर, बाळकृष्ण बोंद्रे, दीपिका अढाऊ, श्रीकांत खोणे, प्रभारी समाजकल्याण अधिकारी योगेश जवादे उपस्थित होते. 

अकोला, अकोटचे अर्ज, याद्याच नाहीतसमाजकल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी लाभार्थी निवड करण्याच्या बैठकीत प्राप्त अर्जांच्या याद्या सादर करणे आवश्यक होते. त्यापैकी नावांची निवड समितीच्या बैठकीत झाली असती; मात्र अकोला आणि अकोट पंचायत समितीमधून याद्याच आल्या नाहीत. त्यामुळे या दोन तालुक्यांतील लाभार्थी वगळून यादीला मंजुरी देण्यात आली. या प्रकाराने दोन्ही मोठ्या असलेल्या तालुक्यातील लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. या प्रकाराला दोन्ही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाºयांचा हलगर्जीपणा कारणीभूत असून, त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही याद्या मिळाल्या नसल्याची माहिती आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद