शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ कार्यालयात रोज २० परवान्यांचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 12:53 IST

एक नियमावली ठरविण्यात आली असून, दिवसाला २० जणांना नवीन वाहन परवाना देण्यात येत आहे.

अकोला : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आता तीन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर नवीन वाहन परवाने देण्याचे कामकाज सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. यासाठी एक नियमावली ठरविण्यात आली असून, दिवसाला २० जणांना नवीन वाहन परवाना देण्यात येत आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गर्दी होणार नाही, याचीही खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.राज्यात २४ मार्च रोजी लॉकडाऊन लागू केल्यानंतर बहुतांश शासकीय कार्यालये बंद करण्यात आली होती. त्यामुळे अकोला उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालयही तब्बल तीन महिने बंद होते. या कार्यालयातून या तीन महिन्यात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांना ई पास देण्याचे कामकाज करण्यात आले; मात्र नवीन वाहनांचे रजिस्ट्रेशन, नवीन वाहन परवाना, वाहनाचे पासिंग यासह विविध कामे बंद करण्यात आली होती; मात्र आता टप्याटप्याने उपप्रादेशिक विभागाने या कार्यालयातील कामांना गती देण्याचे काम सुरू केले असून, नवीन वाहनांचे रजिस्ट्रेशन तसेच पासिंगसोबतच आता वाहनचालकांना परवाना देण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार आॅनलाइन अर्ज केल्यानंतर अपॉइनटमेंट मिळालेल्या केवळ २० जणांना नवीन वाहन परवाना देण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. २० पेक्षा अधिक जणांना वाहन परवाना देण्यात येत नसल्याची माहिती आहे.दलाल पुन्हा सक्रियउपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नवीन वाहन परवाना काढण्यासाठी येणाऱ्यांची लूट करण्यासाठी दलाल सक्रिय झाले आहेत. दिवसाला २० च परवाने देण्यात येत असल्याने दलालांकडून पैशाची मागणीही तेवढ्याच मोठ्या रकमेची करण्यात येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटानंतरही या विभागातील दलालांनी वाहनचालकांना लुटण्याचा व्यवसाय सुरूच केल्याची माहिती एका नवीन परवाना काढण्यासाठी आलेल्या युवकाने दिली.नवीन वाहनांच्या पासिंगसोबतच, लर्निंग लायसन्स, परमनन्ट लायसन्सचे काम आता गतीने सुरू करण्यात आले आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कामकाज करण्यासाठी मात्र ज्यांचे काम आहे त्यांनाच कार्यालयात येण्यास परवानगी देण्यात येत आहे. फिजिकल डिस्टन्सिंग तसेच कोरोना रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना केल्यानंतरच आणि आॅनलाइन अपॉइनमेंट असणाºयांनाच प्रवेश देऊन त्यांची कामे करण्यात येत आहेत.- विनोद जिचकार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाRto officeआरटीओ ऑफीस