शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

‘थाळी बजाव’आंदोलनातून महिला वर्धिंनींचा एल्गार! ‘उमेद’ अभियानात हाताला काम द्या, मागणीकडे वेधले सरकारचे लक्ष

By संतोष येलकर | Updated: December 26, 2022 17:06 IST

Akola News: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अभियान अंतर्गत जिल्हयात दोन वर्षांपासून कामापासून वंचित असलेल्या महिला वर्धिनींच्या हाताला काम देण्याच्या मागणीसाठी एल्गार पुकारित सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हयातील महिला वर्धिनींनी ‘थाळी बजाव ’ आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले.

- संतोष येलकरअकोला -  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अभियान अंतर्गत जिल्हयात दोन वर्षांपासून कामापासून वंचित असलेल्या महिला वर्धिनींच्या हाताला काम देण्याच्या मागणीसाठी एल्गार पुकारित सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हयातील महिला वर्धिनींनी ‘थाळी बजाव ’ आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. संबंधित मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांकडे सादर करण्यात आले. ‘उमेद’ अभियानांतर्गत महिला वर्धिनींच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबातील महिलांना सक्षम करण्यासह महिलांचे समूह तयार करण्याचे काम करण्यात आले. या समूहाच्या माध्यमातून ग्रामसभा, प्रभागसंघ तयार करण्यात आले. परंतु, गेल्या २०१८ मध्ये जिल्हयात नियुक्त करण्यात आलेल्या महिला वर्धिनींना अभियानाच्या माध्यमातून कामे देण्यात आली नसल्याने, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे ‘उमेद’ अभियान अंतर्गत जिल्हयातील महिला वर्धिंनींच्या हाताला काम देण्यात यावे, या मागणीसाठी एल्गार पुकारित जिल्हयातील महिला वर्धिनींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘थाळी बजाव’ आंदोलन करून मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले. संबंधित मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या ग्राम विकास मंत्र्यांकडे सादर करण्यात आले. ‘उमेद’ अभियानाच्या जिल्हा समन्वयक तथा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य प्रतिभा अवचार यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या थाळी बजाव आंदोलनात उमा महल्ले, वर्षा पातुरे, दुर्गा नकासकर, मीना नकासकर, उषा खोसे, कांता गाडे, संध्या वानखडे, संगीता डोंगरे, रूपाली घाडगे, जयश्री अढाऊ, रेखा घाटे, विद्या मानकर, शारदा फाटकर, ज्योती इंगळे, पूजा निकाडे, मिरा जावळे, पूजा अवचार, माया दंदी, सुचिता घोगरे, अर्चना गायकवाड, निर्मला भगत, वर्षा बावस्कर, माया ढोरे, माधुरी आठवले, सुप्रीया वानखडे, अरुणा ठोसर, सीमा उजगरे, लिना दामोदर, सुवर्णा लोड यांच्यासह जिल्हयातील महिला वर्धिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

 ‘थाळी बजाव’ ने दणाणला जिल्हाधिकारी कार्यालय परिसर !‘उमेद’ अभियानातील महिला वर्धिनींच्या ‘थाळी बजाव ’ आंदोलनाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला होता. तसेच या आंदोलनाने नागरिकांचेही लक्ष वेधले .

टॅग्स :Akolaअकोला