शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अस्तिवात नसलेल्या योजनेच्या लाभासाठी महिलांची गर्दी; जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 13:40 IST

अकोला : महिलांना आजन्म प्रती महिना चार हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची कोणतीही योजना अस्तिवात नसताना, या योजनेच्या लाभासाठी अकोला व अमरावती जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करण्याकरिता महिलांनी धडपड केली.

ठळक मुद्देप्रती महिना चार हजार रुपये अर्थिक सहाय्य देण्यात यावे, अशा मागणीचे महिलांकडून मोठ्या प्रमाणात प्राप्त होणारे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक-जावक शाखेत स्वीकारण्यात आले. अस्तिवात नसलेल्या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याकरिता अमरावती व अकोला जिल्ह्यातील महिलांनी गत महिनाभरात चांगलीच धावपळ केली.

- संतोष येलकर

अकोला : महिलांना आजन्म प्रती महिना चार हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची कोणतीही योजना अस्तिवात नसताना, या योजनेच्या लाभासाठी अकोला व अमरावती जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करण्याकरिता महिलांनी धडपड केली.राज्यातील १८ ते ५९ वर्षे वयोगटातील महिलांना आजन्म प्रती महिना चार हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी अकोला व अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करण्यासाठी गत महिनाभराच्या कालावधीत महिलांची गर्दी होत होती. प्रती महिना चार हजार रुपये अर्थिक सहाय्य देण्यात यावे, अशा मागणीचे महिलांकडून मोठ्या प्रमाणात प्राप्त होणारे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक-जावक शाखेत स्वीकारण्यात आले; परंतु महिलांना आजन्म प्रती महिना चार हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची कोणतीही योजना शासनामार्फत राबविण्यात येत नसताना, यासंदर्भात शासनाकडून कोणतेही आदेश नसताना, अस्तिवात नसलेल्या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याकरिता अमरावती व अकोला जिल्ह्यातील महिलांनी गत महिनाभरात चांगलीच धावपळ केली. अर्ज सादर करण्याकरिता गत १ आॅगस्टपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयांत महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.अर्ज स्वीकारणे बंद!महिलांना आजन्म प्रती महिना चार हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची कोणतीही योजना अस्तित्वात नाही, तसेच यासंदर्भात शासनाचे कोणतेही आदेश किंवा निर्देश जिल्हा प्रशासनाला प्राप्त नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक-जावक शाखेत जिल्ह्यातील महिलांचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया १ आॅगस्टपासून बंद करण्यात आली, तसेच अशा प्रकारचे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे. अमरावती जिल्ह्यात असे अर्ज स्वीकारण्याचे काम यापूर्वीच जिल्हा प्रशासनामार्फत बंद करण्यात आले.अर्जांसाठी महिलांचा खर्च पाण्यात!आजन्म प्रती महिना चार हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी महिलांना प्रत्येकी २० ते ३० रुपये खर्च करावा लागला; मात्र अशा प्रकारची कोणतीही योजना अस्तित्वात नसल्याने, त्यासाठी अर्ज सादर करण्याकरिता महिलांचा खर्च पाण्यात गेला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालयAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय