शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री मुक्ती परिषद: आंबेडकरी चळवळीचा आवाज बुलंद करा! - रोहिणी टेकाडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 12:21 IST

अकोला : देशातील महिलांचे मुक्तिदाते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, असे सांगत महिलांनी आंबेडकरी चळवळीचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन पुणे येथील रोहिणी टेकाडे यांनी मंगळवारी येथे केले.

अकोला : देशातील महिलांचे मुक्तिदाते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, असे सांगत महिलांनी आंबेडकरी चळवळीचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन पुणे येथील रोहिणी टेकाडे यांनी मंगळवारी येथे केले.भारिप बहुजन महासंघ महिला आघाडी जिल्हा शाखेच्यावतीने शहरातील अशोक वाटिका येथे आयोजित स्त्री मुक्ती परिषदेत प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. जगात सर्वप्रथम स्त्री-पुरुष समानतेचा संदेश तथागत गौतम बुद्ध यांनी दिला, असे सांगत २५ डिसेंबर १९२७ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मनुस्मृती’चे दहन करून देशातील समस्त स्त्रियांच्या उद्धाराचे कार्य केले, असे त्या म्हणाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांच्या आधारे महिलांनी चळवळीचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन रोहिणी टेकाडे यांनी केले. भारिप-बमसं महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रभा सिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेला प्रामुख्याने जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, वंदना वासनिक, रेखा अंभोरे, अ‍ॅड. धनश्री देव, किरण बोराखडे, आशा अहिरे, इंदू भड, आशा इंगळे, सरला मेश्राम, लक्ष्मी सरिसे, आशा एखे, सूर्यकांत घनबहादूर, सुवर्णा जाधव, संगीता खंडारे, सुनंदा चांदणे, पार्वती लहाने, शोभा आठवले, हिना चौधरी, सुनीता रंगारी, मनीषा मते, विद्या अंभोरे, कविता राठोड, सुषमा कावरे, माजी मंत्री डॉ. डी. एम. भांडे, भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, ज्ञानेश्वर सुलताने, दीपक गवई, अ‍ॅड. संतोष रहाटे, रामा तायडे व गजानन गवई उपस्थित होते. या परिषदेचे प्रास्ताविक प्रतिभा अवचार यांनी केले. संचालन शोभा शेळके तर आभार मंगला सिरसाट यांनी मानले. स्त्री मुक्ती परिषदेला जिल्ह्यातील भारिप-बमसं महिला आघाडीच्या पदाधिकारी-कार्यकर्ता महिला उपस्थित होत्या.परिषदेत ११ ठराव मंजूर!स्त्री मुक्ती परिषदेत ११ ठराव मंजूर करण्यात आले. त्यामध्ये २५ डिसेंबर हा दिवस भारतीय स्त्री मुक्ती दिन जाहीर करावा, आरक्षणावर गदा आणणाऱ्या व्यवस्थेचा निषेध, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलेला शासनाच्या ई-क्लास जमिनीचा ताबा देण्यात यावा, स्त्रियांवर होणारे लैंगिक अत्याचा त्वरित थांबवावे, फुले-आंबेडकरी चळवळीत जात-भाषेचा वापर न करणे, ‘आरएसएस’च्या शस्त्रपूजेवर बंदी घालावी, कोरेगाव-भीमा प्रकरणाचे सूत्रधार मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे यांना तत्काळ अटक करावी, शिक्षणाचे बाजारीकरण थांबवावे, बहुजन वर्गाला आरोग्याच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध कराव्या, आदिवासींना ई-क्लास जमीन हक्क देण्यात यावे व अकोला मनपाचा अवाजवी कर त्वरित रद्द करावा इत्यादी ठरावांचा समावेश आहे. 

 

टॅग्स :Akolaअकोला