शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आव्हानांवर मात करून महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावले पाहिजे - प्रतीक्षा तेजनकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 18:52 IST

अन्न धान्य वितरण अधिकारी प्रतीक्षा तेजनकर यांनी महिला दिनाच्या पृष्ठभूमीवर ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केले.

- संतोष येलकर

अकोला : प्रशासनात काम करताना महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी आणि आव्हानांचा सामना करावा लागतो; मात्र त्यामुळे खचून न जाता येणाºया आव्हानांवर मात करून महिला अधिकारी व कर्मचाºयांनी आपले कर्तव्य बजावले पाहिजे, असे मत अकोल्याच्या अन्न धान्य वितरण अधिकारी प्रतीक्षा तेजनकर यांनी महिला दिनाच्या पृष्ठभूमीवर ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केले. महिला अधिकारी व कर्मचाºयांना काम करताना अडचणी येतात का?-होय, प्रशासनात महिला अधिकारी व कर्मचारी म्हणून काम करताना अनेक अडचणी येत असतात, तसेच वेगवेगळ्या आव्हानांचा सामनाही करावा लागतो; परंतु आव्हानांच्या परिस्थितीत येणाºया अनुभवातून शिकत गेल्यास कर्तव्य बजावण्याची ऊर्जा मिळते. त्यामुळे येणाºया अडचणी व आव्हानांना सामोरे जाऊन महिला अधिकारी व कर्मचाºयांनी खंबीरपणे आपले कर्तव्य बजावले पाहिजे.महिला कर्मचाºयांना सांभाळाव्या लागणाºया जबाबदारीचे स्वरूप कसे आहे?-महिला अधिकारी आणि कर्मचाºयांना कौटुुंबिक आणि कार्यालयात काम करण्याची अशी दुहेरी जबाबदारी सांभाळावी लागते. घरात मुला-बाळांची काळजी घेण्यासह महिला अधिकारी-कर्मचारी कार्यालयात मनापासून काम करतात. कार्यालयीन वेळेत महिला अधिकारी -कर्मचारी कार्यालयाबाहेर जात नसल्याने, त्यांच्याकडून होणारे कार्यालयीन कामकाजाचे प्रमाणही जास्त असते. तसेच काम करताना महिला-अधिकारी कर्मचाºयांकडून टाळाटाळ होत नाही. लहान मुलांचे संगोपन आणि कार्यालयीन कामाची जबाबदारी पार पाडताना कमालीची ओढाताण होते. त्यामुळे केंद्राच्या धर्तीवर राज्यात महिला अधिकारी व कर्मचाºयांना प्रसूती व बालसंगोपनाची रजा मिळाली पाहिजे.प्रशासनातील महिलांचा टक्का वाढत आहे का?-प्रशासनातील महिला अधिकारी व कर्मचाºयांचा टक्का कमी असला तरी, वाढत आहे. कौटुंबिक जबाबदारी आणि प्रशासनात काम करताना येणाºया आव्हानांमुळे काही ठिकाणी काम करण्याची जबाबदारी स्वीकारणे काही प्रमाणात टाळले जाते. त्यामुळे आव्हानांचा सामना करून खंबीरपणे काम करण्याची तयारी केल्यास प्रशासनातील महिला अधिकारी व कर्मचाºयांचा टक्का वाढणार आहे. 

 भविष्यातील आपले ‘व्हिजन’ काय?- शेतकरी, गरीब आणि उपेक्षित घटकांच्या अडचणी सोडविण्याची गरज आहे, तसेच आई-वडिलांचे छत्र नसलेल्या अनाथ मुला-मुलींचा शोध घेऊन, त्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने भविष्यात प्रयत्न करण्याचा माझा मानस आहे. 

 

टॅग्स :Akolaअकोलाinterviewमुलाखत