शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

महिला वैद्यकीय अधिकाऱ्यास लाच घेताना अटक

By admin | Updated: April 6, 2017 20:45 IST

अकोला- महान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची शिरभाते हिला गुरुवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना अटक केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई: वाढीव पगाराची थकबाकी देण्यासाठी घेतली लाचअकोला: बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची शिरभाते हिला गुरुवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बारा हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली. तिच्याकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली. तक्रारकर्ता हा महान प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चालक पदावर कार्यरत आहे. चालकाच्या वाढीव पगाराची थकबाकी देणे शिल्लक आहे. त्यामुळे चालकाने वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची शिरभाते हिच्याकडे वाढीव पगाराची थकबाकी देण्याची मागणी केली; परंतु डॉ. शिरभाते थकबाकी देण्यास सातत्याने टाळाटाळ करीत होती. चालकाने वारंवार मागणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. शिरभाते हिने चालकाकडे बारा हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्याचे निश्चित झाल्यावर चालकाने बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. या तक्रारीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक उत्तमराव जाधव यांच्या मार्गदर्शनात महान येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात असलेल्या शासकीय निवासस्थानामध्ये सापळा लावण्यात आला. चालकाने बारा हजाराची रक्कम आणल्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची शिरभाते हिने लाच स्वीकारली. लाच घेताच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिला रंगेहात अटक केली. तिच्यावर बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिरभाते हिला न्यायालयात हजर करण्यात येईल. वैद्यकीय अधिकाऱ्याबाबत कर्मचाऱ्यांच्या तक्रारीमहान प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची शिरभाते हिच्या वर्तणुकीबद्दल तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी अनेकदा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे तक्रारी केल्या होत्या; परंतु त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. डॉ. शिरभाते ही कर्मचाऱ्यांना उद्धट वागणूक द्यायची, टाकून बोलायची; त्यामुळे अनेक आरोग्य कर्मचारी, परिचारिकांनी तिच्याबद्दल तक्रारी केल्या. पैसे घेतल्याशिवाय ती कर्मचाऱ्यांचीसुद्धा कामे करीत नसे.